जैरामपुरात पाण्याचा कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:30 AM2017-09-29T00:30:45+5:302017-09-29T00:31:22+5:30
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ग्रामसभेत ग्रामस्थांशी चर्चा करून मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी किती पाण्याची गरज असून किती पाणी उन्हाळ्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ग्रामसभेत ग्रामस्थांशी चर्चा करून मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी किती पाण्याची गरज असून किती पाणी उन्हाळ्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे. याचा कृती आराखडा मंगळवारी तयार करण्यात आला.
जैरामपूर हे वैनगंगा नदीजवळ वसलेले गाव आहे. या गावात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबिन तर रब्बी हंगामात कडधान्य, गळीत धान्य व भाजीपाला पिके घेतली जातात. गावाची लोकसंख्या १ हजार ५५४ एवढी आहे. गावात पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. गावाचे भौगोलिक क्षेत्र ५६५.१९ हेक्टर एवढे आहे. पशुपक्षी व नागरिकांसाठी १०३२.८४ टीएमसी पाण्याची गरज आहे. पाण्याची पूर्ण करण्यासाठी कृषी विभागामार्फत तीन नाल्यांचे खोलीकरण, एक डावा नाला काठ दुरूस्ती, ४८ बोड्यांचे नूतनीकरण, ५३.३० हेक्टर क्षेत्रावर मजगी तसेच सिंचाई विभागामार्फत ६१ नवीन विहिरी कृती आराखड्यात घेऊन करण्यात आल्या. गावाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी जैरामपूर येथील प्रगतशील शेतकरी भाऊराव दिवसे, सरपंच अंकुश शेडमाके, उपसरपंच हरीश निकाळे, कृषी सहायक विजय पत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. जास्तीत जास्त जलसंधारण करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ग्रामसभेदरम्यान करण्यात आले.