जलसंवर्धन ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:58+5:302021-06-25T04:25:58+5:30
आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयात ‘जलसाक्षरता अभियान - २०२१ : भूजल पुनर्भरण’ या ...
आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयात ‘जलसाक्षरता अभियान - २०२१ : भूजल पुनर्भरण’ या विषयावरील ई-कार्यशाळेत ते बोलत होते.
ई-कार्यशाळेत चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, भारतीय युवा कल्याण संस्था गडचिरोलीचे मनोहर हेपट, भूजल सर्वेक्षण विकास आणि यंत्रणा गडचिरोली येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक टी. पी. सयाम, उपसंचालक मंगेश चाैधरी सहभागी झाले.
याप्रसंगी प्रा.डॉ. दुधपचारे, मनोहर हेपट यांनी जलसाक्षरतेत विद्यार्थ्यांची भूमिका आणि लोकसहभाग या विषयावर मार्गदर्शन केले. टी. पी. सयाम यांनी पाण्याचा ताळेबंद आणि विहीर, विंधन विहीर पुनर्भरण या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रियदर्शन गणवीर, तज्ज्ञ मार्गदर्शकांचा परिचय उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, प्रा. पराग मेश्राम, डॉ. विजय गोरडे यांनी करून दिला. आभार रासेयो प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. सीमा नागदेवे, प्रा. डॉ. गजेंद्र कढव, प्रा.डॉ. विजय गोरडे, डॉ. सतीश कोला, प्रा. सुनील चुटे, डॉ. किशोर वासुर्के, प्रा. वैभव पडोळे, डॉ. नरेश बन्सोड यांनी सहकार्य केले.