लोकसहभागातूनच जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:32 PM2018-03-22T22:32:05+5:302018-03-22T22:32:05+5:30

पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे.

Water Consumption through Public Sector | लोकसहभागातूनच जलसमृद्धी

लोकसहभागातूनच जलसमृद्धी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जलजागृती सप्ताहाचा समारोप

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे. तेव्हा पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून जलसमृध्दीकडे जाण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम गुरूवारी झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, समाजसेवक देवाजी तोफा, प्राचार्य सविता सादमवार, प्राचार्य संजय नार्लावार, मनोहर हेपट, संदीप लांजेवार, कार्यकारी अभियंता अ.अ. मेश्राम आदी उपस्थित होते.
लोकांपर्यंत पोहचून जनआंदोलनाच्या माध्यमाने जल जागृतीपर संदेश द्या, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिले. पाण्याचा गैरवापर टाळून मोजक्याच पाण्याने आपली गरज भागवा असेही आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी समाजसेवक देवाजी तोफा बोलतांना म्हणाले की,&‘आम्ही भारताचे लोक’ जलसंवर्धन करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहोत. पाण्याचे नियोजन चुकत असल्यामुळे येणारा काळ भयंकर स्वरुपाचा असेल याची जाणीव आजच होत आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनात महिलांचा सहभाग गरजेचा आहे. सर्वांच्या मनस्थितीत बदल झाल्याशिवाय परिस्थीतीत बदल होणार नाही, असे आवाहनात्मक मत व्यक्त केले.
प्राचार्य सविता सादमवार म्हणाल्या की, मनाने एखादी गोष्ट स्विकारत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्याला यश येत नाही. आपल्या भौतिक सुखासाठी निसर्गाला मानव ओरबाडून नियम तोडत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या म्हणीचा अर्थ आम्ही समजून घेतला नाही तर २०५० पर्यंत पृथ्वीला वाळवंटाचा ग्रह म्हणून ओळखला जाईल असा इशारा त्यांनी दिला. संचालन डी. वाय. भांडेकर यांनी तर आभार सहायक अभियंता डी. डी. समर्थ यांनी मानले.
विजेत्या स्पर्धकांचा गौरव
जलजागृती सप्ताह १६ मार्च २०१४ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आला. यादरम्यान निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम विजेता आदित्य जयदेव गेडाम, व्दितीय प्रतिक्षा यशवत गोडणे आणि तेजस तानाजी भेंडारे व तृतीय ओम अशोक पुन्नमवार यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला.

Web Title: Water Consumption through Public Sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.