एक किमी अंतराहून आणतात पाणी

By admin | Published: May 12, 2016 01:25 AM2016-05-12T01:25:53+5:302016-05-12T01:25:53+5:30

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली भागात अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.

Water from a distance of 1 km | एक किमी अंतराहून आणतात पाणी

एक किमी अंतराहून आणतात पाणी

Next

कोपेलात टंचाई तीव्र : नाल्याच्या पाण्यावर भागविली जात आहे तहान
आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली भागात अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. या परिसरातील कोपेला या गावात असलेले दोन्ही हातपंप बंदस्थितीत आहेत. परिणामी येथील नागरिकांना गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या पेद्दावागू नाल्याचे पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी आणावे लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गावानजीक असलेल्या पेद्दावागू नाल्यामध्ये प्रचंड उष्णतामानामुळे एका खड्ड्यात तळाशी पाणी आहे. येथील पाणी गावातील नागरिक वापरण्यासाठी नेत आहेत. मात्र सदर पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे सर्व ग्रामस्थांना नाल्यातील पाणीही पुरेनासे झाले आहे. त्यातच ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठीही याच नाल्याच्या खड्ड्यातील पाणी वापरले जात आहे. परिणामी गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अधिकाधिक तलाव दुरूस्ती व खोलीकरणाचे कामे घेऊन पाणी साठवणूक क्षमता वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोपेल्ला परिसरात योग्यरीत्या कामे होत नसल्याने पाणी टंचाईचा प्रश्न आणखीच तीव्र होत आहे. प्रशासनाने कोपेला गावात पाणी पुरवठ्याची सुविधा करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

युवकांचे तेलंगणा राज्यात पलायन
आसरअल्ली परिसरातील युवक वन विभागाच्या कामावर दरवर्षी जात होते. मात्र यंदा वन विभागाने कोणतेही काम घेतले नाही. परिणामी गावात बेरोजगारीची समस्या जटील झाली असून कोपेल्ला परिसरातील युवक तेलंगणा राज्यात रोजगारासाठी पलायन करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Water from a distance of 1 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.