धान रोवणीसाठी इटियाडोह प्रकल्पाचे पाणी साेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:34 AM2021-08-01T04:34:07+5:302021-08-01T04:34:07+5:30
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इटियाडोह पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी व देसाईगंज तालुक्यांचा समावेश आहे. दोन्ही ...
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इटियाडोह पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी व देसाईगंज तालुक्यांचा समावेश आहे. दोन्ही तालुक्यातील धान हे मुख्य पीक असून काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने पुरेशा पावसाअभावी या भागातील रोवणीची कामे खोळंबली आहेत.
धानाच्या भरोशावर येथील शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून असल्याने निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता व मतदार संघातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने बाघ इटियाडोह पाटबंधारे प्रकल्पातून खरीप हंगामातील धान पिकाच्या रोवणीकरीता पाणी सोडण्याची कार्यवाही करून सहकार्य करण्याची मागणी आमदार गजबे यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना केली आहे.
(बॉक्स)
- तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार
पेरणी केलेल्या धानाची रोपे कोमेजून त्यांची वाढ खुंटलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी धानाची कशीतरी रोवणी केली त्यांचे पीक पावसाअभावी करपण्याच्या अवस्थेत आहे. दोन्ही तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असल्याने खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या धानाचे उत्पादन न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
310721\img-20201228-wa0081.jpg
आरमोरी विधानसभा क्षेञ आमदार क्रीष्णा गजबे