पाणी समस्या मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:15 AM2018-03-30T00:15:07+5:302018-03-30T00:15:07+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले.
ऑनलाईन लोकमत
आष्टी : येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी पाणी व्यवस्था करण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांना आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
मागील एक महिन्यापासून आष्टी रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नोवाईकांना पिण्यासाठी तसेच बाह्य कामाच्या वापरासाठी पाणी मिळत नव्हते. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेत, ग्रामीण रुग्णालयातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाºयांना आष्टीत पाठविले व येथे बोअरवेल खोदण्याचे निर्देश दिले.
भूजल विभागाच्या अधिकारी आष्टीच्या रुग्णालयाला भेट देऊन परिसरातील गोची पाणी केली. बोअरवेलसाठी रुग्णालयाच्या पढील भागात जागा निश्चित करून त्या ठिकाण्ीा बोअरवेल खादण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आष्टीच्या रुग्णालय परिसरात यापूर्वी तीन ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आले. मात्र तिन्ही ठिकाणी पाणी लागले नाही. त्यामुळे रुग्णालयात पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर झाली. मात्र आता जिल्हाधिकारी सिंह यांनी दखल घेतल्याने ही समस्या मार्गी लागणार आहे. लोकमतने पाणीटंचाईबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने रुग्णालयात अतिरिक्त नळ कनेक्शन दिले. त्यामुळे रुग्णांना पाण्याची सुविधा होईल, अशी आशा वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. बोअरवेल खोदताना तसेच जागेची पाहणी करताना भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात सभोवतालच्या ३० ते ४० गावातील रुग्ण दररोज औषधोपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना येथे सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे.
गडचिरोलीतील समस्या सुटणार
मागील १५ दिवसांपासून जिल्हा सामान्य रूग्णालयात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अधिकारी व मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. पाणी टंचाईची समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी रूग्णालयात बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, न.प.च्या अधिकाºयांची बैठक पार पडली. जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने रुग्णालयातील पाणी समस्या मार्गी लागणार आहे.