आरमोरीकरिता पाणी साठा आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:12+5:302021-06-18T04:26:12+5:30
आरमोरी: आरमोरी शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता आरमोरी नगर परिषदेने मागील वर्षी आरमोरी पाणी पुरवठा नळ ...
आरमोरी: आरमोरी शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता आरमोरी नगर परिषदेने मागील वर्षी आरमोरी पाणी पुरवठा नळ योजनेकरिता घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी वैनगंगा नदीवरून रवि गावाजवळून १.३० दलघमी पाण्याचा हक्क मिळण्याबाबतचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. मान्यतेने वैनगंगा नदीवरून रवि गावाजवळून आरमोरी पाणी पुरवठा योजनेकरिता सन २०५२ ची लोकसंख्या विचारात घेऊन १.२७ दलघमी या मोठ्या प्रमाणात बिगर सिंचन आरक्षण हक्काच्या प्रस्तावास विविध अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.
(कोट)
आरमोरी येथे नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; मात्र अद्यापही तांत्रिक मान्यता मिळाली नाही. पाण्याची वाढत असलेली गरज लक्षात घेता आरमोरी पाणी पुरवठा योजनेकरिता १.२७ दलघमी पाणी आरक्षणास मान्यता देण्यात आली आहे.
माधुरी सलामे
मुख्याधिकारी, नगर परिषद, आरमोरी.