जलाशये तहाणलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 10:02 PM2017-09-02T22:02:03+5:302017-09-02T22:03:09+5:30

सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे.

Water reservoir | जलाशये तहाणलेलीच

जलाशये तहाणलेलीच

Next
ठळक मुद्देसरासरीच्या ७४ टक्के पाऊस : तलावांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक जलाशये कोरडी आहेत. धानाचे पीक निघण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यापुढचे दोन महिने पुरेसा पाऊस न झाल्यास धान पीक धोक्यात येऊन दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे मुख्य उत्पादन घेतले जाते. जवळपास दीड लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. धान पिकाला धानाच्या रोवणीपासून तर शेवटपर्यंत पावसाची गरज भासते. धानाला शेवटपर्यंत पाणी देण्यासाठी मामा तलाव, गाव तलाव, बोड्या बांधण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी या तलावांमध्ये साचविले जाते. सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण कमी होते. कडक ऊन पडण्यास सुरूवात होत असल्याने शेतकरी धान पिकासाठी तलावातील पाण्याचा उपयोग करतात. त्यामुळे धानाचे पीक निघण्यासाठी तलाव भरले असणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. मध्यंतरी पावसाअभावी रोवणीचे कामे थांबली होती. त्यावेळी शेतकºयांनी तलाव फोडून रोवणी केली होती. त्यामुळे तलावात साचलेला जलसाठा आणखी कमी झाला. काही तलाव आता ३० ते ४० टक्केच भरली आहेत. एवढ्या पाण्याच्या भरवशावर शेवटपर्यंत धान पिकाला पाणी पुरविणे अशक्य असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी पावसाने अगदी सुरूवातीपासून हुलकावणी देण्यास सुरूवात केली. त्यामुळे धानाच्या रोवणीची कामे आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत चालली. धानाचे पºहे टाकल्यानंतर ३० दिवसांच्या आत रोवणी झाल्यास धानाची वाढ होण्यास पुरेसा कालावधी उपलब्ध होतो व उत्पादन मिळते. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने धानाच्या रोवणीची कामे लांबली आहेत. परिणामी धानाच्या उत्पादनातही कमालीची घट येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला नाही तर तलावातील पाणी संपून धान पीक करपण्याचा धोका आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
रेगडी तलावात ६१ टक्केच जलसाठा
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील तलाव हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून जवळपास ४० किमी अंतरावरील शेतीला जल सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकºयांचे लक्ष या तलावाकडे लागून राहते. हा तलाव दिना नदीवर बांधण्यात आला असल्याने पावसाळ्यात लवकरच भरतो. असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी हा तलाव आॅगस्ट महिना उलटला तरी अजूनपर्यंत भरला नाही.
१ सप्टेंबरपर्यंत या तलावात केवळ ६१ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी १ सप्टेंबरला हा तलाव १०० टक्के भरला होता. रेगडी तलावाच्या अंतर्गत धान पिकाची शेती आहे. त्यामुळे जवळपास दोन महिने आणखी पाणी पुरवावे लागणार आहे. १०० टक्के तलाव भरला असला तरच दोन महिने पाणी पुरणार आहे. तलावाचा नहर सोडण्यात आला आहे. त्यामुळे तलावातील पाणी कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणे आवश्यक आहे.
सोयाबिन, कापूस पीक जोमात
चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये सोयाबिन, कापूस पिकाचेही उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे सोयाबिन, कापूस पीक जोमात असल्याचे दिसून येत आहे. कापसाला डवरणी करण्याचे काम नुकतेच पार पडले आहे.
 

Web Title: Water reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.