पंधरवड्यापासून काेरचीच्या वाॅर्डातील नळ याेजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:35 AM2021-03-05T04:35:56+5:302021-03-05T04:35:56+5:30
काेरची शहरातील वाॅर्ड क्रमांक १४ मध्ये साैरऊर्जेवर चालणारी नळ याेजना आहे. या वाॅर्डात ३० ते ४० घरे आहेत. २००च्या ...
काेरची शहरातील वाॅर्ड क्रमांक १४ मध्ये साैरऊर्जेवर चालणारी नळ याेजना आहे. या वाॅर्डात ३० ते ४० घरे आहेत. २००च्या आसपास येथे लाेकसंख्या आहे. येथील नागरिक नळाच्याच पाण्याचा वापर करीत हाेते. परंतु नळयाेजना बंद पडल्याने पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत वॉर्डातील नागरिकांनी २३ फेब्रुवारीला नगर पंचायतीला निवेदन दिले होते. परंतु अजूनही या निवेदनाची दखल संबंधित विभागाने घेतली नाही. सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. नळ याेजना बंद पडल्याने सध्या नागरिक विहिरीचे पाणी वापरत आहेत. परंतु येथील पाणी वापरण्यायाेग्य नाही. विहीर परिसरात घाण पसरलेली दिसून येते. या ठिकाणी ब्लिचिंग पावडरसुद्धा टाकण्यात आलेले नाही. नागरिक दूषित पाण्याचा वापर करीत असल्याने त्यांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता आहे. नगरपंचायत प्रशासनाने वाॅर्ड क्रमांक १४ मधील साैरऊर्जा नळयाेजनेतील बिघाड लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी धनराज मडावी, धरमसाय नैताम, श्रीराम नैताम, रणजीत कुमरे, महेश पोरेटी, संजय काटेंगे, दुःखू पुडो, अनिल उईके, झाडुराम पोरेटी, परसराम पोरेटी, दुर्गासाय नैताम, रमेश पोरेटी, मीना काटेंगे, अमायबाई पोरेटी, बाबुराव पोरेटी, रामू दर्रो, वंदना दर्रो, उर्मिला नैताम, सुलताना पोरेटी, शारदा नैताम, ललिता दर्रो आदी नागरिकांनी केली आहे.
काेट
काेरची शहरातील वाॅर्ड क्रमांक १४ मधील बिघडलेल्या साैरऊर्जा नळ याेजनेची चौकशी केली जाईल. किरकाेळ बिघाड असल्यास असल्यास लगेच दुरुस्ती केली जाईल. मोठा बिघाड असल्यास त्यासाठी पाठपुरावा करून दुरुस्ती केली जाईल.
डॉ. कुलभूषण रामटेके,
मुख्याधिकारी
नगर पंचायत, कोरची