आश्रमशाळेला मिळणार पाणी

By admin | Published: February 13, 2016 12:53 AM2016-02-13T00:53:13+5:302016-02-13T00:53:13+5:30

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील येंगलखेडा येथे शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते.

Water will be available to the ashram school | आश्रमशाळेला मिळणार पाणी

आश्रमशाळेला मिळणार पाणी

Next

स्वतंत्र पाणी योजना : येंगलखेडा आश्रमशाळेतील पाणी समस्या सुटणार
मालेवाडा : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील येंगलखेडा येथे शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेला पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने वर्षभर विद्यार्थ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन या आश्रमशाळेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार केली जाणार आहे. याजेनेच्या विहिरीचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य निर्मला पारसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एम. टी. भोवते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन सयाम, ग्राम पंचायत सदस्य कोमेश्वर धोंडणे, महिला अधीक्षिका सी. आर. पसीने, सगनू नरोटे, मनाबाई नरोटे, प्रकाश नरोटे, हरबा सलामे, रामसाय होळी, वाय. एन. झंझाळ, बी. एस. राऊत, बी. टी. वालदे, गुणाजी मडावी, उमाकांत बावनथडे, शाखा अभियंता व्ही. एस. कोल्हे, विजय चौधरी उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने टाकी बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. आश्रमशाळेपासून दोन किमी अंतरावर असलेल्या नाल्यामध्ये विहिरीचे खोदकाम केले जात आहे. तेथून शाळेच्या आवारात पाईपलाईन टाकली जात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत शाळेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. इतरही महिन्यांमध्ये अपुरा पाणी मिळत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे या आश्रमशाळेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बांधण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात होती. या मागणीची दखल घेत आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. (वार्ताहर)

Web Title: Water will be available to the ashram school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.