पाण्याच्या टाकीवर चढून पानठेलाधारकांची वीरूगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:00 AM2018-10-28T00:00:38+5:302018-10-28T00:01:24+5:30

शहरातील पानठेलाधारकांवर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या कठोर कारवाईचा निषेध करण्यासाठी जवळपास २५ पानठेलेधारकांनी आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात निदर्शने केली.

Watercolor owners' protection on the water tank | पाण्याच्या टाकीवर चढून पानठेलाधारकांची वीरूगिरी

पाण्याच्या टाकीवर चढून पानठेलाधारकांची वीरूगिरी

Next
ठळक मुद्देगडचिरोलीत आंदोलन : खर्रा विक्रीबंदी आदेशाचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील पानठेलाधारकांवर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या कठोर कारवाईचा निषेध करण्यासाठी जवळपास २५ पानठेलेधारकांनी आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात निदर्शने केली. दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पानठेलेधारक टाकीवरच चढून असल्याने त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. आधी रोजगार उपलब्ध करून द्या, त्यानंतरच पानठेल्यांवर कारवाई करा अशी त्यांची मागणी होती.
आठ दिवसांपूर्वी नगर परिषदेने इंदिरा गांधी चौकातील पानठेलेधारकांना नोटीस बजावली होती. या चौकातच महिला रुग्णालय आहे. महिला रुग्णालयापासून १०० मीटर अंतरावर असलेले पानठेले हटविण्यात यावे, असे नोटीसमध्ये म्हटले होते. नोटीस प्राप्त झाल्यानंतर पानठेलाधारकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले. मात्र प्रशासन कारवाई करण्यावर ठाम आहे.
पानठेलाधारकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यानंतरच पानठेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ओबीसी संघटनेचे रूचित वांढरे यांच्या नेतृत्वात शहरातील जवळपास २५ पानठेलेधारक शनिवारी दुपारी ३ वाजता पाण्याच्या टाकीवर चढले. पाण्याची टाकी गांधी चौकातच असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. ४ वाजताच्या सुमारास पोलीस पोहोचले. त्यानंतर एसडीओ डॉ.सचिन ओंबासे, एसडीपीओ विशाल ढुमे, ठाणेदार दीपरत्न गायकवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी घटनास्थळ गाठून आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. पानठेल्यांवर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.
कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आंदोलक टाकीवर खाली उतरेपर्यंत प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. एसडीओ डॉ.ओंबासे यांनी पानठेलाधारकांसोबत चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले. समजूत घालून कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले.

Web Title: Watercolor owners' protection on the water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.