म्युकरमायकाेसिस परतीच्या मार्गावर, चार जणांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:52+5:302021-06-16T04:47:52+5:30
बाॅक्स गडचिराेलीत उपचाराची सुविधा नाही म्युकरमायकाेसिस हा अत्यंत जटिल आजार आहे. या आजारावर उपचारासाठी नेत्र तज्ज्ञ व इतर तज्ज्ञांची ...
बाॅक्स
गडचिराेलीत उपचाराची सुविधा नाही
म्युकरमायकाेसिस हा अत्यंत जटिल आजार आहे. या आजारावर उपचारासाठी नेत्र तज्ज्ञ व इतर तज्ज्ञांची गरज भासते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. एवढी सुविधा गडचिराेली जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने संशयित आढळून आलेल्या रुग्णांना नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय किंवा एम्समध्ये पाठविले जाते.
म्युकरमायकाेसिसची प्राथमिक लक्षणे
म्युकरमायकाेसिस झालेल्या रुग्णाला चेहऱ्याच्या एका बाजूला गालाच्या हाडावर सूज येते. डाेके दुखते, नाक बंद झाल्यासारखे वाटून श्वास घेण्यास त्रास हाेतो. ताप येतो. काही वेळेला रुग्णाच्या नाकाच्या वरजा बाजूवर कपाळाखाली व ताेंडामध्ये काळे व्रण दिसून येतात. हा आजार लवकरच गंभीर स्वरूप धारण करतो.
कसा संसर्ग हाेताे
गंभीर स्थितीतील रुग्णाला बरेच दिवस ऑक्सिजनवर ठेवले जाते. सिलिंडरमधून येणारा ऑक्सिजन अतिशय काेरडा असताे. ताे श्वास मार्गाच्या पातळ अस्तराला इजा करू शकतो. त्यामुळे एका पाण्याने भरलेल्या नळीतून बुडबुड्यांच्या स्वरूपात आद्र केला जातो. या नळीला ह्युमिडीटी फायर म्हणतात. या ठिकाणचे पाणी वेळाेवेळी बदलले गेले नसल्यास बुरशीजन्य जंतू नाकात प्रवेश करतात. काेराेनामुळे आधीच राेगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रुग्णावर ही बुरशी तुटून पडते.
म्युकरमायकाेसिसमुळे झालेले एकूण मृत्यू ३
उपचार घेत असलेले रुग्ण ४