हनुमाननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:36 AM2021-03-21T04:36:35+5:302021-03-21T04:36:35+5:30

चामोर्शी : येथील मुख्य रस्त्यावर हायवेचे काम सुरू आहे. एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू असून दुसऱ्या ...

On the way to Hanuman Nagar, the traffic was heavy | हनुमाननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली

हनुमाननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली

Next

चामोर्शी : येथील मुख्य रस्त्यावर हायवेचे काम सुरू आहे. एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू असून दुसऱ्या बाजूने रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू असून त्या रस्त्याने प्रंचड वाहनाची वाहतूक राहत असल्याने व रस्त्यावर धुळीचा त्रास होत असल्याने अनेक वाहनधारक हनुमाननगरकडे, बायपास जुन्या तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रचंड वाहनाची वाहतूक वाढली असून त्या रस्त्यावर वाहनाची व पाद्चारी याची प्रंचड गर्दी असते.

घोटावरून चामोर्शी मार्गे येणाऱ्या सर्व चारचाकी, दुचाकी वाहने तसेच पादचारी व त्या परिसरात राहणारे नागरिक यांचे रस्त्याने ये - जा सुरू आहे. याच परिसराजवळ शाळा, कॉॅम्प्युटर, ऑनलाईन दुकाने, हॉटेल, चहा दुकाने, पानठेले, इतर व्यावसायिक दुकाने, बीएसएनएलचे कार्यालय आहे. अनेक वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा आपली वाहने उभी करुन ठेवत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे . अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: On the way to Hanuman Nagar, the traffic was heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.