योजनेतून वडसाचा विकास करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:58 PM2018-04-09T22:58:10+5:302018-04-09T22:58:10+5:30

राज्यातील विकसनशील नगर परिषद म्हणून देसाईगंज पालिकेची ओळख आहे. देसाईगंज शहराच्या सर्वागिण विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून विविध योजना राबवून शहराचा विकास घडवून आणणार, अशी ग्वाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

We will develop Vadsas from the scheme | योजनेतून वडसाचा विकास करू

योजनेतून वडसाचा विकास करू

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : देसाईगंजात ग्रीन जिम व सिटी सर्वे कामाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : राज्यातील विकसनशील नगर परिषद म्हणून देसाईगंज पालिकेची ओळख आहे. देसाईगंज शहराच्या सर्वागिण विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून विविध योजना राबवून शहराचा विकास घडवून आणणार, अशी ग्वाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
स्थानिक नगर पालिकेच्या वतीने ग्रीन जिम व देसाईगंज शहरातील सिटी सर्वे कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शालू दंडवते, मुख्याधिकारी तैमुर मुलानी, भूमिलेख अधीक्षक डाबेराव, उपविभागीय अधिकारी मेश्राम, तहसीलदार सोनवाने यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, प्रशासकीय व शासकीय स्तरावर महाराष्टÑ राज्य प्रगतशील बनण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. देसाईगंज नगर परिषद अनेक वर्षांपासून विविध विकसनशील योजन राबवित असून गौरवप्राप्त पालिका म्हणून या पालिकेचा महाराष्टÑात नावलौकिक आहे. शहरातील नागरिकांना मालमत्तेची कागदोपत्री मालकी प्राप्त व्हावी यासाठी सिटी सर्वेचा शुभारंभ करण्यात आला.
आ. कृष्णा गजबे म्हणाले, ग्रामीण भागात मनरेगा, रोहयो तसेच कृषी क्षेत्रात विविध योजना शासनातर्फे राबविले जातात. सदर योजना देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात राबविण्यात याव्या, यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाला न. प. चे सभापती, नगरसेवक व नागरिक हजर होते.
दिव्यांगांना धनादेशाचे वितरण
ेसाईगंज नगर परिषदेच्या वतीने पालिका क्षेत्रातील दिव्यांगांना तीन टक्के राखीव निधीतून धनादेशाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. याचा लाभ शहरातील अनेक दिव्यांगांनी घेतला. दिव्यांगांसाठी शासनाने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन दिव्यांगांनी आपला विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह व आ. कृष्णा गजबे यांनी आपल्या भाषणातून केले.

Web Title: We will develop Vadsas from the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.