चारही जागा स्वबळावर ताकदीने लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:10 AM2018-09-08T01:10:09+5:302018-09-08T01:11:15+5:30
२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र चार वर्षाच्या सत्ताकाळात ही सारी आश्वासने फोल ठरली आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. भाजपप्रती लोकांमध्ये रोष आहे. जिल्ह्यात शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेच्या मिळून चारही जागा स्वबळावर पूर्ण ताकदनिशी लढविणार, असा निर्धार विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला.
शिवसेना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, नागपूर जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, अहेरी जिल्हा प्रमुख विजय श्रुंगारपवार, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख छाया कुंभारे, संघटक अशोक धापोडकर, माजी जिल्हाध्यक्ष हरीष मने, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख डॉ. अश्विनी यादव, युवासेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, शिवसेना शहर प्रमुख रामकिरीत यादव, उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, भरत जोशी, वासुदेव शेडमाके, विलास ठोंबरे, राकेश बेलसरे, राजगोपाल सुल्वावार, सुवर्णसिंग डांगी, सत्यनारायण बुर्रावार, निलकमल मंडल, अनंत बेझलवार, डॉ. श्रीकांत बन्सोड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना किर्तीकुमार म्हणाले, नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी, आत्महत्या आदी समस्याने उग्ररूप धारण केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लोकांमध्येही भाजपप्रती रोष दिसून येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावागावात पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, डॉ. अश्विनी यादव, यांच्यासह इतर मान्यवरांनी शिवसैनिकांना संबोधित केले. मेळाव्याला तालुका प्रमुख नंदू चावला, कवडू सहारे, माणिक भोयर, गुणवंत जंबेवार, गुणवंत जंबेवार, अशोक गावतुरे, आशिष काळे, रोशन नंदनवार, संदीप दुधबळे, संजय आकरे, प्रशांत किलनाके, सुनंदा आतला, नवनाथ उके, नगरसेविका अनिता बोरकर, चित्रा गजभिये यांच्यासह बाराही तालुक्यातून तीन हजार शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार
१९९५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना हा सर्वात प्रबळ पक्ष होता. या पक्षाचे आमदार सुध्दा निवडून आले. याच कालावधीत आपण गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळले आहे. मध्यंतरीच्या काळात दुर्लक्ष झाल्याने पक्षाला थोडीफार मरगळ प्राप्त झाली. आता मात्र पुन्हा बुथ स्तरावरून बांधणी केली जाणार आहे. पूर्व विदर्भातील सहा लोकसभा व ३६ विधानसभा स्वतंत्र लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. पक्षाच्या अंदाजानुसार यापैकी चार लोकसभा व २० विधानसभेच्या जागांवर मध्ये यश मिळेल. २०१४ मध्ये भाजपाचे वादळ होते. आता मात्र हे वादळ शमले आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगली संधी आहे, असा विश्वास गजानन किर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.