पुष्पगुच्छ देऊन केले प्रवाशांचे स्वागत

By admin | Published: June 2, 2016 02:55 AM2016-06-02T02:55:20+5:302016-06-02T02:55:20+5:30

राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन परिवहन दिन म्हणून बुधवारी मोठ्या उत्साहात गडचिरोली, कुरखेडासह जिल्हाभरात साजरा करण्यात आला.

Welcome to the floozy travelers | पुष्पगुच्छ देऊन केले प्रवाशांचे स्वागत

पुष्पगुच्छ देऊन केले प्रवाशांचे स्वागत

Next

गडचिरोली व कुरखेडात कार्यक्रम : राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन उत्साहात
गडचिरोली/कुरखेडा : राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन परिवहन दिन म्हणून बुधवारी मोठ्या उत्साहात गडचिरोली, कुरखेडासह जिल्हाभरात साजरा करण्यात आला. दरम्यान गडचिरोली व कुरखेडाच्या बसस्थानकावर पुष्पगुच्छ देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली बसस्थानकात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख तथा जि. प. सदस्य छाया कुंभारे, कालिंदा कडवे, शकून नंदनवार, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी एस. पी. डाऊ आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी एसटी प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगार व्यवस्थापक विनेश बावणे, संचालन अरूण पेंदाम यांनी केले तर आभार वासनिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाहतूक निरीक्षक पी. आर. बासनवार, अतिरिक्त वाहतूक निरीक्षक एस. डब्ल्यू. भोयर, राठोड, दीक्षित, वाढ, धारणे, चन्नुरवार, तिवारी, मडावी, शेरकी आदींनी सहकार्य केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त कुरखेडा येथील जुन्या बसस्थानकावर महामंडळ प्रशासनाच्या वतीने प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी व कुरखेडाचे प्रभारी पोलीस निरीक्षक कटारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वनकर, काँग्रेसचे कुरखेडा तालुकाध्यक्ष जयंत हरडे, कुरखेडा बसस्थानक प्रमुख आर. एस. राठोड, बसचालक मेश्राम, वाहक लकवडे, प्रज्ञा राऊत, आकाश गुंडावार, एजाज शेख, बबलू शेख यांच्यासह प्रवाशी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी प्रवासाबाबत जनजागृती करून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Welcome to the floozy travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.