कुटुंबांचे कल्याण साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:35 PM2017-08-14T23:35:49+5:302017-08-14T23:36:10+5:30
आधुनिक युगात विविध साधनांच्या माध्यमातून मानवाची प्रगती होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आधुनिक युगात विविध साधनांच्या माध्यमातून मानवाची प्रगती होत आहे. मात्र वैचारिक मतभेद असल्याने बºयाचदा कुटुंबाची वाताहत होते. परिणामी समाजावरही परिणाम होतात. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे व स्नेहाचे कायम ठेवून कुटुंबाचा कल्याण साधण्याचे कार्य झाले पाहिजे, हे कौटुंबिक कल्याण समितीचे महत्त्वाचे काम आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने नुकतेच कौटुंबिक कल्याण समिती केंद्राचे उद्घाटन न्याय सेवा सदन गडचिरोली येथे करण्यात आले. शिवाय यावेळी कौटुंबिक कल्याण समितीची स्थापना करून प्रशिक्षणही घेण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड, न्या. एस. टी. सूर, मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एम. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) एन. सी. बोरफलकर, दुसरे दिवाणी न्यायाधीश एन. पी. वासाळे, के. आर. सिंघेल, कौटुंबिक कल्याण समितीच्या सदस्य वैशाली पदवाड, वैशाली सूर, सुरेखा बारसागडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय मेहरे यांनी कौटुंबिक कल्याण समितीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी ४९८ अ मध्ये पोलिसांची भूमिका काय असली पाहिजे, याबाबत सविस्तरपणे मौलिक मार्गदर्शन केले. एस. टी. सूर यांनी कौटुंबिक समितीमध्ये पदाधिकाºयांची भूमिका कोणती असेल, याबाबतची माहिती दिली. मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी कौटुंबिक कल्याण समितीच्या स्थापनेचा हेतू विशद केला. संचालन न्या. ता. के. जगदाडे यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपीक बी. व्ही. वाळके यांनी मानले. कर्मचाºयांनी सहकार्य केले.