दिल्लीला गेलेल्या स्वस्त दुकानदार संतारामचे काय झाले?; कुटुंबीय चिंतेत

By दिगांबर जवादे | Published: April 28, 2023 04:03 PM2023-04-28T16:03:12+5:302023-04-28T16:03:47+5:30

आंदोलनस्थळी जाताना अचानक झाला गायब

What happened to cheap shopkeeper Santaram who went to Delhi? He suddenly disappeared while going to the protest site | दिल्लीला गेलेल्या स्वस्त दुकानदार संतारामचे काय झाले?; कुटुंबीय चिंतेत

दिल्लीला गेलेल्या स्वस्त दुकानदार संतारामचे काय झाले?; कुटुंबीय चिंतेत

googlenewsNext

गडचिरोली : कोरची तालुका मुख्यालयापासून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या गाहणेगाटा येथील स्वस्त धान्य दुकानदार संताराम बुधराम पोरेटी (वय ४६) हे तालुक्यातील अन्य ११ स्वस्त धान्य दुकानदारांसह २० मार्चला दिल्ली येथे तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलनासाठी गेले. मात्र सव्वा महिन्याचा कालावधी उलटूनही संताराम परत आले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. दिल्लीतील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन सर्वजण आंदोलनस्थळी पोहोचले. या दरम्यान संताराम पोरेटी हे हरवले.

दिल्लीच्या नंदीग्राम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आली; पण सव्वा महिना उलटूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही. संताराम यांचे कुटुंब चिंतेत पडले आहेत; मात्र संताराम परत येतील, अशी आशा पोरेटी कुटुंब बाळगून आहेत. पोरेटी यांचे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, मुले असे संयुक्त कुटुंब आहे. पोरेटी कुटुंब पोलिस स्टेशन दिल्ली येथे नेहमी फोन करून विचारणा करतात. त्यांचा शोध सुरू आहे, असे पाेलिस सांगतात. अधूनमधून पाेलिसांचेही फोन येतात व संताराम घरी आला काय असे विचारतात.

यापूर्वीही एकदा ते दिल्लीला जाणार होते. मात्र त्यांच्या कुटुंबाने विरोध केला होता. अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान आहे. संताराम परत आले नसल्याने दुकानाची जबाबदारी पत्नी सुगंधाला सांभाळावी लागत आहे. मुलगी वैशाली (१९) नीटच्या परीक्षेसाठी नांदेडला गेली आहे. वडील परत न आल्याने ती चिंतित आहे. मुलगा ओम (१६) हा लाखनी सैनिक शाळेतून सुट्टी घेऊन परत आला.

तहसीलदार व संघटनेचे अध्यक्ष काय म्हणातात?

- कोरचीचे प्रभारी तहसीलदार चंद्रशेखर गजभिये यांना विचारणा केली असता कार्यालयातून त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून कामे देऊन पाठवण्यात आले नाही. संघटनेमार्फत ते गेले असल्याने सर्वच जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची असल्याचे लोकमतला सांगीतले.

स्वस्त धान्य दुकानदार संघटना कोरचीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र वालदे यांना विचारणा केली असता, संघटनेचे काही लोक दिल्लीला जाऊन त्यांचा शोध घेतील. त्याचा पूर्ण खर्च संघटना करेल, असे सांगितले. मात्र दिल्लीत शोध घेणार कसा, हा प्रश्न आहे.

Web Title: What happened to cheap shopkeeper Santaram who went to Delhi? He suddenly disappeared while going to the protest site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.