कोरोनाच्या लसींचे ‘कॉकटेल’ केले तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:20+5:302021-06-03T04:26:20+5:30

(बॉक्स) तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात, या पद्धतीने लसीचे कॉकटेल करण्याबाबत अद्याप तरी सूचना नाही. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च ...

What if you made a ‘cocktail’ of corona vaccines? | कोरोनाच्या लसींचे ‘कॉकटेल’ केले तर?

कोरोनाच्या लसींचे ‘कॉकटेल’ केले तर?

googlenewsNext

(बॉक्स)

तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात,

या पद्धतीने लसीचे कॉकटेल करण्याबाबत अद्याप तरी सूचना नाही. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च यांच्याकडून त्याबाबत संशोधन सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात अद्याप कोणत्या रुग्णाला अशा पद्धतीने कॉकटेल लस देण्यात आलेली नाही.

- डॉ.समीर बन्सोडे

समन्वयक, लसीकरण

---

लसींचे कॉकटेल करण्याच्या प्रयोगाबाबत सूचना नाही. पण त्यावर अभ्यास सुरू आहे. तांत्रिक सल्लागार समितीकडूनही अशा प्रयोगाचा फायदा होईल का, याबाबत अभ्यास सुरू आहे. जिल्ह्यात एखाद्याकडून अनवधानाने दुसरी लस घेतली असेल तरी त्याबाबत कोणत्याही दुष्परिणामाची तक्रार आलेली नाही.

- सुनील मडावी

तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली

(बॉक्स)

जनजागृतीसाठी कसरत

अनेक तालुक्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाबाबत बरेच गैरसमज आणि अफवा पसरल्या आहेत. लस घेतल्यास माणूस कमजोर होतो, शारीरिक दुबळेपणा येतो. माणूस मरूही शकतो अशा अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे लस खरंच किती फायद्याची आहे आणि ही लसच कोरोनापासून बचाव करू शकेल, असे सांगण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Web Title: What if you made a ‘cocktail’ of corona vaccines?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.