व्हाट्स अ‍ॅपने लागला मुलाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:47 AM2017-10-04T00:47:10+5:302017-10-04T00:48:00+5:30

सोमवारी गडचिरोली पोलिसांकडे पोहोचलेल्या सात वर्षीय मुलाचा व्हाट्स अ‍ॅपमुळे २४ तासात शोध लागला.

The Whats App Launched the Child's Search | व्हाट्स अ‍ॅपने लागला मुलाचा शोध

व्हाट्स अ‍ॅपने लागला मुलाचा शोध

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रपूरच्या रामनगरातील मुलगा गडचिरोलीत गवसला

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सोमवारी गडचिरोली पोलिसांकडे पोहोचलेल्या सात वर्षीय मुलाचा व्हाट्स अ‍ॅपमुळे २४ तासात शोध लागला. पोलीस अधिक्षकांची सूचना आणि ठाणेदार सांगळे यांच्या समयसूचकतेमुळे कुटुंबीयांपासून दुरावलेल्या त्या मुलाला पुन्हा त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचता आले.
चंद्रपूरच्या रामनगरातील भगतसिंग चौकातील रहिवासी असलेले बारकचंद बारई यांचा सात वर्षाचा मुलगा रविवारी अचानक गायब झाला. त्यामुळे त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी रामनगर पोलिसात केली. दरम्यान तो मुलगा मंगळवारी गडचिरोली ठाण्यात पोहोचला. पण थोडा मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्याला नाव गाव सांगता येत नव्हते. ठाणेदार संजय सांगळे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व्हाट्स अ‍ॅपवरून ही माहिती सर्वत्र कळविण्यास सांगितले. पो.नि.सांगळे यांनी इतर ग्रुपसह पोलिसांच्या ‘एमपीए ९०’ या ग्रुपवर ही माहिती टाकली. रामनगर ठाण्याच्या निरीक्षकांनी ती माहिती पाहताच त्याच्या पालकांना बोलवून सांगितले. त्यांनी त्याला लगेच ओळखले. मंगळवारी त्यांनी गडचिरोली गाठल्यानंतर ठाणेदार सांगळे यांनी त्याला त्यांच्या स्वाधीन केले.

Web Title: The Whats App Launched the Child's Search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.