एसटीची चाके आता येताहेत रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:00 AM2021-02-08T05:00:00+5:302021-02-08T05:00:57+5:30

राज्य शासनाने शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून प्रत्येक शनिवारी व रविवारी सुटी दिली आहे. दाेन दिवस शासकीय कार्यालये बंद राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्थळी येत नाही. तसेच शासकीय कर्मचारीही प्रवास करीत नसल्याने हे दाेन दिवस एसटीला पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित आहेत. तसेच महाविद्यालये बंद आहेत.

The wheels of the ST are now on track | एसटीची चाके आता येताहेत रुळावर

एसटीची चाके आता येताहेत रुळावर

Next
ठळक मुद्देपूर्ण क्षमतेने बसफेऱ्या सुरू, ग्रामीण भागातही पाेहाेचत आहे एसटी

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाचा प्रभाव कमी हाेताच गडचिराेली आगारातून पूर्ण क्षमतेने बसेस साेडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची साेय हाेण्याबराेबरच एसटीलाही उत्पन्न मिळत आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी जवळपास तीन महिने एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली हाेती. त्यानंतर काही अटी व शर्ती घालून बससेवा सुरू करण्यात आली. मात्र लाॅकडाऊन कायम असल्याने तसेच काेराेनाची भीती नागरिकांमध्ये कायम असल्याने नागरिक बसमध्ये बसत नव्हते. परिणामी एसटी आगाराकडून कमी प्रमाणात बसेस साेडल्या जात हाेत्या.  काेराेनाचा  प्रभाव कमी झाल्यानंतर आता एसटी गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दर दिवशी ७.५ लाखांचे उत्पन्न
गडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. त्यातील ४९ बसेस मानव विकास मिशनच्या आहेत. सर्वच मार्गांवर आता बसेस सुरू आहेत. दर दिवशी ३४ हजार किमी बसेस चालतात. त्यातून ७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. बसफेऱ्या पूर्वीएवढ्याच साेडण्यात येत असल्या तरी उत्पन्न मात्र कमी मिळत आहे. 

शनिवार, रविवारच्या सुटीचा फटका

राज्य शासनाने शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून प्रत्येक शनिवारी व रविवारी सुटी दिली आहे. दाेन दिवस शासकीय कार्यालये बंद राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्थळी येत नाही. तसेच शासकीय कर्मचारीही प्रवास करीत नसल्याने हे दाेन दिवस एसटीला पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित आहेत. तसेच महाविद्यालये बंद आहेत. या सर्व कारणांमुळे बसचे प्रवासी कमी झाले आहेत. याचा माेठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. सरासरी ४० एवढे भारमान मिळत आहे.

मागील १५ दिवसांपासून  जिल्ह्यातील सर्वच मार्गांवर बसेस नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच नांदेड, गाेंदियाा, मानपूर, चिमूर, उमरखेड या लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू झाल्या आहेत. पूर्वीएवढ्याच बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र आता प्रवासी कमी प्रमाणात  मिळत आहेत. प्रवाशांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.
मंगेश पांडे, एसटी आगारप्रमुख, गडचिराेली

Web Title: The wheels of the ST are now on track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.