४० हजारांची लाच घेताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:03 PM2018-10-11T23:03:35+5:302018-10-11T23:03:52+5:30

वन कायद्यांतर्गत लाकूड चोरीच्या गुन्ह्यात अटक करताना सवलत देण्यासाठी आणि जप्त केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना वनपाल रमेश पन्नू बलैया (३२) याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरूवारी (दि.११) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गडचिरोली पथकाने केली.

When taking a bribe of Rs 40,000, the forester is trapped in ACB's trap | ४० हजारांची लाच घेताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात

४० हजारांची लाच घेताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (गडचिरोली) : वन कायद्यांतर्गत लाकूड चोरीच्या गुन्ह्यात अटक करताना सवलत देण्यासाठी आणि जप्त केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना वनपाल रमेश पन्नू बलैया (३२) याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरूवारी (दि.११) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गडचिरोली पथकाने केली.
आरोपी वनपाल चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं) उपक्षेत्रातील रेंगेवाही येथे कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या भावावर वनपाल रमेश बलैया याने लाकूड चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याची मोटारसायकलही जप्त केली होती. दरम्यान अटक करताना सवलत द्यावी आणि मोटारसायकल सोडून द्यावी यासाठी वनपाल बलैया याने १ लाख २० हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये देण्यास सांगितले. दरम्यान तक्रारकर्त्याने गडचिरोलीतील एसीबी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरूवारी मार्कंडा (कं) क्षेत्राच्या जंगल परिसरात सापळा लावण्यात आला. दरम्यान तडजोडीअंती ४० हजार रुपये तक्रारकर्त्याकडून पंचसाक्षीदारांसमक्ष स्वीकारताना वनपाल बलैया याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (सुधारित) २०१८ अन्वये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई एसीबी नागपूरचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, राजेंद्र नागरे, उपअधीक्षक विजय माहुलकर, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली एसीबी पथकाचे निरीक्षक रवी राजुलवार, सहा.फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, नायक रविंद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, कॉन्स्टेबल देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडकार, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवआर, सोनल आत्राम, सोनी तवाडे यांनी केली.

Web Title: When taking a bribe of Rs 40,000, the forester is trapped in ACB's trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.