पॅसेंजर रेल्वे अनलॉक कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:40 AM2021-08-19T04:40:18+5:302021-08-19T04:40:18+5:30

देसाईगंज : कोरोनाचा संसर्ग सामान्य जनतेला होऊ नये यासाठी शासनाने दीड वर्षापूर्वी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करून सर्व पॅसेंजर रेल्वे बंद ...

When will the passenger train be unlocked? | पॅसेंजर रेल्वे अनलॉक कधी होणार?

पॅसेंजर रेल्वे अनलॉक कधी होणार?

Next

देसाईगंज : कोरोनाचा संसर्ग सामान्य जनतेला होऊ नये यासाठी शासनाने दीड वर्षापूर्वी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करून सर्व पॅसेंजर रेल्वे बंद केल्या. आजघडीला कोरोना बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. त्यामुळे सर्व व्यवहार हळूहळू ‘अनलॉक’ होत आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच अजूनही लॉक का? असा प्रश्न तमाम रेल्वे प्रवाशांच्या मनात उठत आहे.

कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूचा जनतेच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये तसेच त्यांचा बळी जाऊ नये म्हणून केंद्र शासनाने मार्च २०२० ला लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. यात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन अनेकांचा बळीही गेला. मात्र आता दुसरी लाट जवळजवळ संपण्याच्या स्थितीत असल्यानेच इतर व्यवहारांमध्ये शासनाने सूट दिली आहे. एसटी बसेसचा प्रवास तर खूप आधीपासून सुरू आहे. एवढेच नाही तर अनेक एक्स्प्रेस गाड्याही सुरू झाल्या. मग सामान्य जनतेच्या पॅसेंजर रेल्वे प्रवासासाठीच आडकाठी का, असा प्रश्न केला जात आहे. शासकीय नियमांच्या अधीन राहून पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात अशी प्रवाशांची भावना आहे.

(बॉक्स)

दररोज ८ पॅसेंजर, १५०० पर्यंत प्रवासी

कोविड-१९ या महामारीपूर्वी वडसा रेल्वे स्टेशनवरून दररोज ८ पॅसेंजर गाड्या आणि आठवड्याला ६ अतिजलद सुपरफास्ट गाड्या धावत होत्या. ुपॅसेंजर गाड्यांमध्ये चांदाफोर्ट ते गोंदिया या प्रमुख गाडीचा समावेश होता. जलद गाड्यांमध्ये बिलासपूर-चेन्नई, यशवन्तपूर-कोरबा, दरभंगा-सिकंदराबाद या लांब पल्ल्याच्या व अतिजलद गाड्यांचा समावेश होता. वडसा रेल्वे स्टेशनवरून बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची संख्या दररोज १२०० ते १५०० एवढी राहात होती. त्यातून दररोज अंदाजे एक ते दिड लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत होते. सध्या त्या उत्पन्नापासून रेल्वेला वंचित राहावे लागत आहे.

(बॉक्स)

मालवाहू वाहनातून वाढली कमाई

शासनाने लोकडाऊनच्या काळात पॅसेंजर रेल्वे सुरू केली नसली तरी मालवाहू गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यांचे प्रमाण काहीसे वाढले आहे. वडसावरून सध्याच्या परिस्थितीत दररोज ३० मालवाहू गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्याचा मोबदला मिळत आहे. तरी पॅसेंजर रेल्वे सुरू केली तर सामान्य जनतेसाठी मोठी गैरसोय दूर होणार आहे.

(बॉक्स)

गजबजून राहणारे रेल्वे स्टेशन भकास

नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यत गजबजून राहणारे वडसा हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक आज मात्र भकास वाटत आहे. हे स्टेशन मूक व शून्य नजरेने प्रवाशांची वाट पाहात आहे. सध्या या स्टेशनवर फक्त रेल्वे कर्मचारी आपली दैनंदिन कामे करीत असतात. अधूनमधून येणाऱ्या जाणाऱ्या मालगाडीचा हॉर्न तेवढा ऐकायला मिळतो. बाकी वेळ उदासीनता दिसत आहे.

(कोट)कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्यामुळे इतर बाबीप्रमाणे शासकीय नियमांच्या अधीन राहून ज्या प्रवाशांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले असतील, त्यांना तसे प्रमाणपत्र दाखवून किंवा तसे नसेल तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवून प्रवासाची संधी दिली जाऊ शकते. यात दररोज किमान एक पॅसेंजर रेल्वे सोडली तरी प्रवाशांची बरीच सोय होईल.

रितेश कुमार, स्टेशन मास्टर, वडसा

Web Title: When will the passenger train be unlocked?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.