धानाेरा तालुक्यात पक्के रस्ते केव्हा बांधणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:57+5:302021-06-30T04:23:57+5:30

धानाेरा तालुक्यातील रांगी, बाेदीन, मुरुमगाव परिसरातील काही गावांमधून जाणारे रस्ते अद्यापही कच्च्या स्वरूपात आहेत. या रस्त्यांचे पक्के बांधकाम केव्हा ...

When will paved roads be constructed in Dhanera taluka? | धानाेरा तालुक्यात पक्के रस्ते केव्हा बांधणार?

धानाेरा तालुक्यात पक्के रस्ते केव्हा बांधणार?

Next

धानाेरा तालुक्यातील रांगी, बाेदीन, मुरुमगाव परिसरातील काही गावांमधून जाणारे रस्ते अद्यापही कच्च्या स्वरूपात आहेत. या रस्त्यांचे पक्के बांधकाम केव्हा हाेणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. जे रस्ते ८ ते १० वर्षांपूर्वी बांधण्यात आले. ते रस्ते सध्या पूर्णत: उखडले आहेत. यातील एक रस्ता साेडे-गुजनवाडी मार्ग हाेय. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. गुजनवाडी परिसरातील नागरिक धानाेरा येथे नेहमी ये-जा करीत असतात. जवळपास सात ते आठ गावांतील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. याशिवाय गडचिराेली तालुक्याच्या मुरमाडी परिसरातील अनेक नागरिक धानाेरा येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. ३ वर्षांपूर्वी या मार्गाची निर्मिती करण्यात आली हाेती. काही वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या रस्त्यांची ही स्थिती आहे, तर ज्या रस्त्यांचे केवळ खडीकरण झाले हाेते, ते रस्ते दुरवस्थेत आहेत.

वासुदेव उसेंडी, धानाेरा

(तक्रार-गाऱ्हाणी या सदरासाठी आपल्या परिसरातील सार्वजनिक समस्या लिहून लोकमत कार्यालय, त्रिमूर्ती चौक, गडचिरोली येथे पोस्टाने, प्रत्यक्ष येऊन किंवा ९४०४८५४६९४ या क्रमांकावर व्हॉट्स ॲपने पाठवू शकता)

Web Title: When will paved roads be constructed in Dhanera taluka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.