देसाईगंज बसस्थानकाचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:40 AM2021-08-28T04:40:52+5:302021-08-28T04:40:52+5:30

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक असावे, असे शासनाचेच धोरण आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथील बसस्थानकाचा प्रश्न ...

When will the work of Desaiganj bus stand actually start? | देसाईगंज बसस्थानकाचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार?

देसाईगंज बसस्थानकाचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार?

googlenewsNext

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक असावे, असे शासनाचेच धोरण आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथील बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आमदार गजबे यांनी बसस्थानकाच्या जागेचा प्रश्न निकाली काढून बांधकामाचा प्रश्न मार्गी लावला होता. बसस्थानकाच्या जागेचा ताबा घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे गडचिराेली विभाग नियंत्रक यांच्याकडून देसाईगंज येथील नझुल खसरा क्रमांक २४/५ मधील खुल्या खंडकापैकी ६१२० चौ. मी. जमिनीची १ काेटी २४ लाख २३ हजार रुपये रक्कम शासनाकडे भरण्यात आली. नगर रचनाकार गडचिरोली यांच्या पत्रानुसार आरक्षण क्रमांक १६ पैकी आयटीआय कार्यालयाच्या मागील बाजूस पश्चिम-उत्तर कोपऱ्यातील २०२५ चौ.मी.क्षेत्र पेट्रोल पंप प्रयोजनार्थ वगळून राज्य परिवहन विभागास २९ नोव्हेंबर २०१८ रोजी आवश्यक क्षेत्रफळाचा ताबा अटी व शर्तीच्या अधिन राहून देण्यात आला. सध्या दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही कुठल्याच हालचाली दिसून येत नाही. शहरात राज्यमहामार्गावरच बसस्थानकाचा कारभार आजपर्यंत सुरू असून वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अनेक अपघातही घडले आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी लवकर लक्ष घालून बसस्थानकाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

विधीमंडळातही झाली हाेती चर्चा

बसस्थानकाचा प्रश्न ८ मार्च २०२१ रोजी राज्याच्या विधीमंडळात अर्थसंकल्प सुरू असताना तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात आमदार गजबे यांनी मांडला. कार्यारंभ आदेशाअभावी रखडलेल्या नवीन बसस्थानकाचे तत्काळ बांधकाम सुरू करण्याची मागणी केली असता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोरोना संकटामुळे बांधकाम सुरू होऊ शकले नाही,असे मान्य करत या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले हाेते. परंतु आजतागायत मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही विलंब का हाेत आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

270821\img_20210819_164041.jpg

बसस्टाॕपचा कारभार हि असा राज्यमहामार्गावर सुरु असल्याने नेहमीच होते वाहतुकीची कोंडी व अपघात.

Web Title: When will the work of Desaiganj bus stand actually start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.