स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन गेले कुठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:38 AM2021-04-02T04:38:33+5:302021-04-02T04:38:33+5:30
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने देशभरात लाॅकडाऊन जाहीर केले हाेते. उद्याेग व्यवसाय सर्व ठप्प पडल्याने मजूर वर्गावर उपासमारीचे संकट काेसळू ...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने देशभरात लाॅकडाऊन जाहीर केले हाेते. उद्याेग व्यवसाय सर्व ठप्प पडल्याने मजूर वर्गावर उपासमारीचे संकट काेसळू नये, यासाठी केंद्र शासनाने एप्रिल ते नाेव्हेंबर या कालावधीत नागरिकांना माेफत धान्याचा पुरवठा केला. काेराेनाचे संकट असतानाही स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याचे वितरण केले. याचे कमिशन मिळणे आवश्यक हाेते. आठ महिन्यांपैकी तीन महिन्यांचे कमिशन देण्यात आले आहे. उर्वरित पाच महिन्यांचे कमिशन देण्यात आले नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये नाराजी पसरली आहे.
शासनाकडून कमिशन जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र त्याचे वितरण अजूनपर्यंत झाले नाही, अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदारांनी दिली आहे. कमिशन उपलब्ध झाले असतानाही त्याचे वितरण का केले जात नाही, असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांनी उपस्थित केला आहे.
बाॅक्स..
मे महिन्याचे धान्य न उचलण्याचा इशारा
काेराेनाच्या कालावधीत जीवावर उदार हाेऊन स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याचे वितरण केले. दुकानदारांना प्रतिक्विंटल कमिशन दिले जाते. नियमितवेळी कमिशन कापूनच दुकानदार पैसे भरतात. मात्र काेराेनाच्या कालावधीत माेफत धान्य वितरण झाल्याने त्याचे कमिशन थेट शासनामार्फत दुकानदारांना द्यावे लागणार आहे. कमिशनची प्रतीक्षा करून दुकानदार थकले आहेत. जिल्हास्तरावर पैसा येऊनही त्याचे वितरण जाणुनबुजून केले जात नाही, असा आराेप दुकानदारांकडून हाेत आहे. एप्रिल महिन्यात कमिशनचे वितरण न झाल्यास मे महिन्याच्या धान्याची उचल न करण्याचा इशारा दुकानदारांनी दिला आहे.