कोठी मदत केंद्रात जाॅबकार्ड नोंदणी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:11+5:302021-06-25T04:26:11+5:30
भामरागड : तालुक्यातील कोठी मदत केंद्रात एकदिवसीय शिबिर आयाेजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची मोफत जाॅबकार्ड नोंदणी करून त्यांना ...
भामरागड : तालुक्यातील कोठी मदत केंद्रात एकदिवसीय शिबिर आयाेजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची मोफत जाॅबकार्ड नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध याेजनांची माहिती देण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन कोठीचे गाव पाटील कन्ना हेडो यांच्या हस्ते झाले. यावेळी पाेलीस उपनिरीक्षक संजय झराड, श्रीनिवास धुळे, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट पी.व्ही. राजेशराज यांच्या हस्ते नागरिकांना जॉबकार्ड वाटप करण्यात आले. त्यानंतर पाेलीस मदत केंद्र हद्दीतील नागरिकांना १८० जॉबकार्ड वाटप करून, ६५ नवीन जॉबकार्ड प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय ५० नवीन आधार कार्ड काढण्यात आले. एक खिडकीच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्डचे प्रस्ताव बनविण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना, बाल संगोपन योजना याविषयी तसेच पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. सहभाेजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
===Photopath===
240621\img-20210621-wa0010.jpg
===Caption===
मेळाव्यात जाबकार्ड वितरण करतांना