कोठी पोलीस मदत केंद्रात महिलांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:27 AM2021-06-06T04:27:39+5:302021-06-06T04:27:39+5:30
. भामरागड तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी गडचिरोली उप विभागीय ...
. भामरागड तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी गडचिरोली उप विभागीय पाेलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोठी मदत केंद्रात ३ जून राेजी महिला जनसंपर्क बैठक घेण्यात आली. बैठकीला कोठी मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय महेश घुगे, संजय झराड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच कोरोना जनजागृती संदर्भात चर्चा करून लसीकरणाचे फायदे सांगण्यात आले. महिला पोलिसांनी आपल्या स्थानिक माडिया भाषेत जनजागृती केली. कोठी पाेलीस मदत केंद्रातील महिला पोलीस अंमलदार शिल्पा बोबडे यांनी आपल्या विवाहनिमित्त ४० महिलांना साडी-चाेळी तसेच चहा व नाश्ता वाटप केला.
===Photopath===
040621\2744img-20210604-wa0000.jpg
===Caption===
महिलांना साड्यांची वाटप करतांना