कुत्र्याचा पाठलाग करता करता बिबट्या शिरला घरात.. महिलेने दाखवले प्रसंगावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 06:38 PM2021-09-15T18:38:19+5:302021-09-15T18:38:44+5:30

Gadchiroli News शिकारीसाठी कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घरात शिरल्याची घटना धानोरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले आहे.

While chasing the dog, the leopard entered the house | कुत्र्याचा पाठलाग करता करता बिबट्या शिरला घरात.. महिलेने दाखवले प्रसंगावधान

कुत्र्याचा पाठलाग करता करता बिबट्या शिरला घरात.. महिलेने दाखवले प्रसंगावधान

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : शिकारीसाठी कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घरात शिरल्याची घटना धानोरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले आहे. (While chasing the dog, the leopard entered the house)

बिबट्याने पाठलाग केल्याने कुत्रा मैनाबाई बोगा यांच्या घरात शिरला. कुत्र्याच्या किंचाळण्यामुळे मैनाबाई जाग्या झाल्या व त्या लागलीच घराबाहेर पडल्या. त्यांच्या मागोमाग कुत्राही घराबाहेर निघला. बिबट घरात अडकल्याचे पाहून मैनाबाई यांनी बाहेरून दरवाजाची कडी लावली व स्वत:चे प्राण वाचवले.

गडचिरोली तालुक्यातील नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी आलेल्या नवेगाव-नागझिरा टायगर रिझर्वच्या चमूने सकाळी मेटेजांगदा गाव गाठून बिबट्याला दुपारी १२.३० वाजता जेरबंद केले. वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके व नवेगाव-नागझिरा टायगर रिझर्वचे वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक, वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. व्ही. मेढेवार यांच्यासह वनकर्मचा?्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: While chasing the dog, the leopard entered the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.