आढावा सभेत माहिती देताना अधिकारी गाेंधळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:39 AM2021-08-26T04:39:44+5:302021-08-26T04:39:44+5:30
आढावा सभेत पंचायत विभाग, बांधकाम विभाग, घरकुल विभाग, स्वच्छ भारत मिशन, कृषी विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ...
आढावा सभेत पंचायत विभाग, बांधकाम विभाग, घरकुल विभाग, स्वच्छ भारत मिशन, कृषी विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, तालुका आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभागाचा सविस्तर आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. देसाईगंज तालुक्याला जिल्हा परिषदेकडून शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि इतर विकासात्मक कामे करण्यास निधी उपलब्ध करून देऊ. देसाईगंज तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद स्तरावरून निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांनी केले.
आढावा बैठकीला जि.प. उपाध्यक्ष मनाेहर पाेरेटी, जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती राेशनी पारधी, पं.स. सभापती रेवता अलाेणे, उपसभापती शेवंता अवसरे, जि.प. सदस्य काेंदडधारी नाकाडे, रमाकांत ठेंगरी व पं.स. सदस्य उपस्थित हाेते.