शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 05:00 AM2021-09-10T05:00:00+5:302021-09-10T05:00:30+5:30

शहरात इंदिरा गांधी चाैक, कारगील चाैक, आयटीआय चाैक हे मुख्य चाैक आहेत. शहरात जाहिरातीचे फलक लावता येतात. मात्र, त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. वाहनधारकांना पुढचे दिसण्यास अडचण हाेणार नाही, अशा ठिकाणची जागा नगरपालिका निवडून देते. याचठिकाणी फलक लावणे अपेक्षित आहे. खासगी कंपन्यांमार्फत हे फलक लावता येतात.

Who is responsible for the disfigurement of the city? | शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार काेण?

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार काेण?

Next

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शहरातील मुख्य चाैकांसह इतर चाैकांमध्ये मिळेल त्या जागेवर जाहिरात तसेच शुभेच्छा देणारे फलक लावले जातात. यामुळे शहराचे विद्रुपीकरण वाढत चालले आहे. नगरपालिका प्रशासन संबंधितांवर कारवाई करत नसल्याने कुठेही फलक लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. 
शहरात इंदिरा गांधी चाैक, कारगील चाैक, आयटीआय चाैक हे मुख्य चाैक आहेत. शहरात जाहिरातीचे फलक लावता येतात. मात्र, त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. वाहनधारकांना पुढचे दिसण्यास अडचण हाेणार नाही, अशा ठिकाणची जागा नगरपालिका निवडून देते. याचठिकाणी फलक लावणे अपेक्षित आहे. खासगी कंपन्यांमार्फत हे फलक लावता येतात. या फलकांच्या माध्यमातून नगरपालिकेला करही मिळतो. हे फलक अधिकृत आहेत, मात्र या फलकांव्यतिरिक्त काही दुकानदार, काेचिंग क्लासेसचे संचालक तसेच राजकारणी व्यक्तींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक कुठेही लावले जातात. यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्या व्यक्तीला पुढचे दिसत नसल्याने अपघात होतात. तसेच कुठेही फलक लावल्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडते. त्यामुळे अशा फलकांवर कारवाई हाेणे गरजेचे आहे. 

पथदिव्यांच्या खांबांना बॅनर लावण्याचे प्रकार वाढले
- एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा वाढदिवस असल्यास किंवा एखाद्या पदावर नियुक्ती झाल्यास बसस्थानक ते बाजार चाैकापर्यंत पथदिव्यांच्या खांबाना शुभेच्छा देणारे बॅनर लावले जातात. रस्त्याच्या मधाेमध असलेल्या बॅनरमुळे वाहनधारकाला पुढचे दिसण्यास अडथळा हाेते. तसेच वाहनधारकांचे या बॅनरकडे लक्ष गेल्याने अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे बॅनर अतिशय धाेकादायक आहेत. मात्र, नगर परिषद प्रशासन काेणतीही कारवाई करत नसल्याने असे फलक लावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. या बॅनरवर कारवाई करण्याची गरज आहे.

नगरसेवकही माेडतात नियम
एखाद्या नगरसेवकाचा किंवा राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवस असल्यास नगरसेवक पथदिव्यांवर शुभेच्छांचे बॅनर लावतात. नगरसेवकच नियम माेडतात.

 

Web Title: Who is responsible for the disfigurement of the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Banerबाणेर