घातक नकलीपेक्षा असलीच का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 05:00 AM2022-02-24T05:00:00+5:302022-02-24T05:00:31+5:30

जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Why not a fake fake? | घातक नकलीपेक्षा असलीच का नाही?

घातक नकलीपेक्षा असलीच का नाही?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदीचा गैरफायदा घेत घातक अशी नकली दारू जिल्हावासीयांच्या गळी उतरविण्याची संधी कोणाला कशाला देता? त्यापेक्षा विष्फळ ठरलेली दारूबंदी दूर करून अधिकृतपणे दारूपुरवठा करा. त्यामुळे दारूचे आकर्षण कमी होण्यासोबत आरोग्यास अपायकारक नकली दारूही लोकांना प्यावी लागणार नाही, असे स्पष्ट मत विविध क्षेत्रांतील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. 
जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले याचेही काही उदाहरण यानिमित्ताने समोर आले. यावरून दारूबंदीने केवळ अवैध विक्रेते आणि नकली दारू बनविणाऱ्यांचेच भले झाले आहे, सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वर्षभरात जिल्ह्यात काेट्यवधी रुपयांची दारू पाेलिसांकडून जप्त केली जाते. तरीही तस्करांकडून दारू आयातीचे प्रमाण कमी हाेताना दिसत नाही. पाेलीस २४ तास पाहारा देऊ शकत नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे.

बंदीऐवजी जनजागृतीवर भर हवा

मुळात दारू ही वाईट आहे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आणि देशभरात ती विक्री करण्यावर, पिण्यावर मनाई का केली जात नाही? केवळ एका जिल्ह्यावर अशी बंदी घालणे हे अन्यायकारक आहे. दारू प्रमाणापेक्षा जास्त घेणे, त्याची सवय जडणे किंवा दारू नकली असणे यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्रमाणात घेतलेली दारू ही वाईट नाही.
- ॲड. मृणाल मेश्राम

गेल्या ३० वर्षांपासून या जिल्ह्यात सुरू असलेली फसवी दारूबंदी अजून किती दिवस सामान्य नागरिकांना फसवत राहणार आहे? केवळ काही लोकांच्या फायद्यासाठी दारूबंदी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणे योग्य नाही. जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्री आहे हे कोणालाही कळते, मग अशी निरर्थक दारूबंदी उठवत का नाही?
- दिलीप मोटवानी

कोणत्याही गोष्टीला विरोध केला की त्याचे आकर्षण वाढते. गडचिरोलीत नेमके हेच होत आहे. मी दारूबंदी ठेवा किंवा उठवा यापेक्षा दारूबंदीचा एवढा बाऊ कशासाठी हे कळत नाही. दारू विक्री सुरू केली तर लोक कदाचित कमी प्रमाणात पितील. कारण त्याचे आकर्षण कमी होईल. शिवाय नकली दारूलाही आळा बसेल. वास्तविक निव्वळ बंदी लादल्याने लोक दारू पिणार नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.            - मनोज देवकुले

 

Web Title: Why not a fake fake?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.