गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:24 AM2021-07-21T04:24:41+5:302021-07-21T04:24:41+5:30
गडचिराेली : गाव तिथे एसटी हे बसचे ब्रीदवाक्य आहे. मात्र काेराेनापासून एसटी प्रामुख्याने शहरांना जाेडणाऱ्या रस्त्यावरच धावत असताना दिसून ...
गडचिराेली : गाव तिथे एसटी हे बसचे ब्रीदवाक्य आहे. मात्र काेराेनापासून एसटी प्रामुख्याने शहरांना जाेडणाऱ्या रस्त्यावरच धावत असताना दिसून येत आहे. एसटीला आपल्या ब्रीदवाक्याचा विसर पडला काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील वाहतुकीची समस्या साेडविण्याच्या उद्देशानेच बससेवा सुरू करण्यात आली. काेराेना साथीच्या पूर्वीपर्यंत शहर व ग्रामीण भागात साेडल्या जाणाऱ्या बसेसचा ताळमेळ जाेडला जात हाेता. ग्रामीण भागातून एसटीला निश्चितच कमी प्रमाणात उत्पन्न मिळते. हे जरी मान्य केले तरी सरकारी नियंत्रणात असलेली ही सेवा आहे. एसटी आर्थिक अडचणीत असताना राज्य शासनाने अनेक वेळा मदत केली आहे. त्यामुळे उत्पन्न कमवितानाच सामाजिक जबाबदारीसुद्धा एसटीला खांद्यावर घेऊन ग्रामीण भागात बस साेडाव्या लागणार आहेत.
बाॅक्स .....
मानव विकास मिशनच्या बसफेऱ्या बंद
मानव विकास मिशनच्या बसेस विद्यार्थिनींची ने-आण करण्यासाठी साेडल्या जात हाेत्या. या बसेसमधून ग्रामीण भागातील नागरिक प्रवास करीत हाेते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थाेडा दिलासा मिळत हाेता. आता मात्र शाळा बंद असल्याने या बसेसुद्धा बंद आहेत. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन साेडल्या जात आहेत.
बाॅक्स .......
खेडगावात जाण्यासाठी ‘काळीपिवळी’चा आधार
ग्रामीण भागात जाण्यासाठी बहुतांश बसफेऱ्या बंदच असल्याने नागरिकांना काळीपिवळीचा आधार घ्यावा लागत आहे. तर काही नागरिक दुचाकीने प्रवास करीत आहेत.
बाॅक्स ......
नागपूर, चंद्रपूर मार्गावर सर्वाधिक फेऱ्या
नागपूर व चंद्रपूर मार्गावर बसला सर्वाधिक प्रवासी मिळत असल्याने या मार्गावर सर्वाधिक बसफेऱ्या साेडल्या जात आहेत. ग्रामीण भागात प्रवासी मिळत नसल्याने डिझेलचा खर्च करण्यापेक्षा एसटी फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी लाेकमतला दिली.
बाॅक्स .....
खेडेगावांवरच अन्याय का?
काेट ......
काेराेनाची साथ कमी झाल्यानंतर नागरिक तहसील स्तरावर विविध कामांसाठी जातात. मात्र बस नसल्याने काळीपिवळी वाहनाचा आधार घेत तालुकास्थळ गाठावे लागते. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातही बसफेऱ्या सुरू कराव्यात.
- प्रशांत दशमुखे, नागरिक
काेट ......
प्रत्येक वेळी आर्थिक बाबींचा विचार करेल तर खासगी बस व एसटीमध्ये काहीच फरक राहणार नाही. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे अजूनही वाहने नाहीत, त्यामुळे एसटीवरच अवलंबून राहावे लागते. ज्या मार्गावर प्रवासी मिळू शकतात, अशा मार्गांवर बसफेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.
- वामन काेकीळ, नागरिक