आमच्यासाठी भंगार बसगाडीच का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:41+5:302021-03-07T04:33:41+5:30
भामरागड : राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातून भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात बसगाड्या सोडल्या जातात. यातील बहुतांश बसेस भंगार राहतात. ...
भामरागड : राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातून भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात बसगाड्या सोडल्या जातात. यातील बहुतांश बसेस भंगार राहतात. आमच्यासाठी भंगार बसच का, आम्ही बसचे तिकीट देत नाही का, असा प्रश्न भामरागड तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अहेरी आगारातून लाहेरी व तालुक्यातील इतर गावांसाठी बसफेरी सोडली जाते. मात्र या बसफेरीसाठी भंगार गाडीच बहुतेकदा वापरली जाते. लाहेरी परिसरात अनेक रस्त्यांवरील डांबरीकरण उखडले आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहेत. हे जरी मान्य केले तरी नेहमीच या मार्गावर भंगार बसेस साेडल्या जातात. शहरी भागातील नागरिकांएवढेच दुर्गम भागातील नागरिकही तिकीट देतात. तरीही बस उपलब्ध करून देताना का भेदभाव केला जाते असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.