चिंतरेवलाजवळ आली रानटी म्हैस; शेतकरी भयभीत !
By गेापाल लाजुरकर | Published: December 30, 2023 05:08 PM2023-12-30T17:08:19+5:302023-12-30T17:09:01+5:30
चिंतरेवल भागातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
गाेपाल लाजूरकर,,गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा परिसरात असलेल्या चिंतरेवलाच्या शेतात शुक्रवार २९ डिसेंबर राेजी दुपारी ४ वाजता रानटी म्हैस वावरताना शेतकरी व शेतमजुरांना दिसली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
अंकिसा गावापासून ३ कि.मी. अंतरावरील चिंतरेवला गावात सध्या कापूस काढणीची कामे सुरू आहेत. गाव परिसरातील एका शेतात. कापूस काढणी सुरू असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतकरी व मजुरांना रानटी म्हैस पिकाजवळ चरताना दिसून आली. मजुरांनी ही रानटी म्हैस असल्याचे ओळखून वेळीच आसरअल्लीच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर रानटी म्हशीच्या शाेधात वन कर्मचारी व अधिकारी आले असता ताेपर्यंत म्हैस जंगलाच्या दिशेने निघून गेली.
या परिसरात सध्या कापूस काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी एकटे-दुकटे शेतात जातात. रानटी म्हैस हल्लेखाेर असल्याने तिच्यापासून धाेका हाेऊ शकताे. त्यामुळे चिंतरेवला व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.