रोपवनामुळे वन्यजीवांचा निवारा होतोय नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:10 PM2019-03-11T22:10:53+5:302019-03-11T22:11:08+5:30

जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

Wildlife is being sheltered due to planting | रोपवनामुळे वन्यजीवांचा निवारा होतोय नष्ट

रोपवनामुळे वन्यजीवांचा निवारा होतोय नष्ट

Next
ठळक मुद्देवन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात : वन विभागाचे नियोजन फेल

प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : जंगलाची घनता वाढावी व झाडांची सुडौलता वाढवावी यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झुडूपी जंगल नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.
मानवीकृत रोपवन तयार करण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. असे रोपवन तयार करण्यासाठी कोरका कटाईच्या नावाखाली दरवर्षी झुडपी जंगल नष्ट केले जाते. कोरका कटाई म्हणजे, जे जमीन व पसरलेली लहान झुडपी रोप तसेच तीन ते चार फुटापर्यंतचे झाडे वन विभागाच्या वतीने मजुरांकरवी तोडून टाकले जातात. यात तृणभक्षी प्राण्यांचे अन्न व निवाराही नष्ट होत आहे. जंगलातील हरीण, ससा, घोरपड यासारख्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तृणभक्षी प्राण्यांवर ज्याचे जीवन आहे, ते मांसभक्षी प्राणी आपल्या अन्नाच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.
मागील २० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मानवीकृत रोपवाटीका वन विभागाने तयार केल्या, पण यामुळे जंगलातील झाडांची संख्या वाढली का? सद्यस्थितीत किती वृक्ष जीवंत आहेत? याबाबतचा निकाल शुन्य आहे. मानवीकृत रोपवाटीकेमुळे वनसंवर्धनाचा कोणताच फायदा आजवर झाला नाही. शिवाय हिरवीगार जंगले व झुडपी जंगले नष्ट झाली. परिणामी तृणभक्षी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नैसर्गिकरित्या वाढलेले झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी मानवीकृत रोपवाटीका तयार करण्यापेक्षा वन विभागाने मोकळ्या ओसाड जागेवर अधिकाधिक रोपवन लावून जंगल क्षेत्र वाढवावे, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांनी केली आहे.
 

Web Title: Wildlife is being sheltered due to planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.