रॅलीतून वन्यजीवांच्या रक्षणाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:42 PM2018-10-01T22:42:31+5:302018-10-01T22:42:51+5:30

१ ते ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. या सप्ताहाचा प्रारंभ सोमवारी गडचिरोली वन विभागाच्या कार्यालयातून करण्यात आला. वनविभागाच्या वतीने शहरात विविध प्रकारचे देखावे आणि आदिवासी नृत्यांचा सहभाग असलेली रॅली काढण्यात आली.

Wildlife conservation jagran rallies | रॅलीतून वन्यजीवांच्या रक्षणाचा जागर

रॅलीतून वन्यजीवांच्या रक्षणाचा जागर

Next
ठळक मुद्देसप्ताहाची सुरूवात : गडचिरोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १ ते ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. या सप्ताहाचा प्रारंभ सोमवारी गडचिरोली वन विभागाच्या कार्यालयातून करण्यात आला. वनविभागाच्या वतीने शहरात विविध प्रकारचे देखावे आणि आदिवासी नृत्यांचा सहभाग असलेली रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आली.
रॅली शहरातील चारही मुख्य मार्गांनी फिरविल्यानंतर धानोरा मार्गावरील वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात विसर्जित करण्यात आली. त्यानंतर खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक डब्ल्यू. आय. यटबॉन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष उध्दव डांगे, मानद वन्यजीव रक्षक मिलींद उमरे, सहाय्यक वनसरंक्षक सोनल भडके, वनपरीक्षेत्र अधिकारी डी.व्ही. कैलुके उपस्थित होते.
कार्यक्रमात खा. अशोक नेते, मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक यटबॉन तसेच मान्यवरांनी वन्यजीव रक्षणाबाबत मार्गदर्शन केले. वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, हे पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले. संचालन वनरक्षक सुनील पेंदोरकर यांनी केले तर आभार सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी मानले. यावेळी नागरिक, सर्पमित्र, गिधाडमित्र, वनरक्षक, वनकर्मचारी तसेच शहरातील शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
देखाव्यातून वन्य जीवांच्या रक्षणाचा संदेश
रॅलीत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखावा सादर केला होता. विविध वन्यजीवांची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी वन्यजीवाच्या रक्षणाचा संदेश देत होते. तसेच गोंडवाना सैनिकी विद्यालयातील अश्वसुध्दा रॅलीमध्ये सहभागी झाले. विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केले. रॅलीमध्ये वाघ, सिंह, अस्वल, ससा, हरीण, शिकारी अशा वेशभूषा धारण केलेले कलाकार सहभागी झाले होते. गिधाड उपहारगृह व कार्यालयाचाही देखावा तयार करण्यात आला होता.

Web Title: Wildlife conservation jagran rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.