वन्यजीवांचे संरक्षण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:00+5:30

वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले.

Wildlife needs protection | वन्यजीवांचे संरक्षण गरजेचे

वन्यजीवांचे संरक्षण गरजेचे

Next
ठळक मुद्देउपवनसंरक्षकांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे लोकसंवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : जंगलाच्या अवैैध तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे. अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात वन्यजीव मौलिक भूमिका बजावतात. यामुळे जंगलाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वडसा वन विभागाचे उप वनसंरक्षक एन. ए. विवरेकर यांनी केले.
वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक उप वनसंरक्षक जी. एम. धोंगडे, सहाय्यक उप वनसंरक्षक व्ही. बी. कांबळे, एस. व्ही. सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी काशिनाथ गेडाम, वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे, एस. एम. डोंगरवार, एम. पी. चांगले उपस्थित होते.
भविष्याच्या दृष्टिकोनातून निसर्गाचा समतोल राखण्यात वन्य जीवांची मौलिक भूमिका आहे. जंगलांची व्याप्ती वाढविण्यात सहाय्यक ठरणारी आहे. जल, जंगल जमिनीचे संरक्षण करण्यात आल्यास अनेक अडचणींवर मात करता येत असल्याने आपले नैतिक कर्तव्य समजून प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही विवरेकर म्हणाले.
कार्यक्रमाला स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक उप वनसंरक्षक व्ही. बी. कांबळे यांनी केले.

योजनांबाबत जागृती
जनसंवादात नागरिकांना वन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सामाजिक वनीकरण, प्रादेशिक आणि वन्यजीव, पीक नुकसान, मनुष्य हानी, मागेल त्याला रोपे, खाजगी वृक्षतोड यासह अन्य योजनांचा समावेश होता. दरम्यान अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांना आपल्या मनातील शंका व समस्यांबाबत विचारणा केली असता, अधिकाºयांनी त्यांच्या शंकांचे योग्य समाधान केले.

Web Title: Wildlife needs protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.