सेवाविषयक कार्यवाही न झाल्यास आंदाेलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:23 AM2021-07-03T04:23:25+5:302021-07-03T04:23:25+5:30
नर्सेस व आराेग्य कर्मचारी सेवाविषयक मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात ...
नर्सेस व आराेग्य कर्मचारी सेवाविषयक मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात अनेकदा निवेदने देण्यात आली. मागण्यांमध्ये कालबद्ध पदोन्नती मंजूर करून त्यांना आर्थिक लाभ देणे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे, स्थायी आदेश व वेतननिश्चिती देणे, सेवापुस्तक अद्ययावत करून प्रत कर्मचाऱ्यांना देणे, वेतन पडताळणी पथक, नागपूर यांच्याकडून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीची पडताळणी करणे, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना गोपनीय अहवालाची प्रत देणे, मासिक वेतनाची स्लिप दरमहा कर्मचाऱ्यांना द्यावी, आदींचा समावेश हाेता.
जिल्हा शल्यचिकित्सकांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष एस. के. चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, सहसचिव एस. के. बावणे, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण, सचिव किशोर सोनटक्के, देवेंद्र दहीकर, नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष अंजू यावले, सचिव सपना आईंचवार व उपाध्यक्षा कविता नांदगाये, आदी उपस्थित होते.