विकास आराखडा बनविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:14 PM2017-10-01T23:14:27+5:302017-10-01T23:14:37+5:30
खुर्सा येथील नागरिक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक दिवसांपासून गावात नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खुर्सा येथील नागरिक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक दिवसांपासून गावात नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांची गावाच्या विकासाबद्दल असलेली तळमळ बघून या गावाचा आदर्श गाव म्हणून प्रस्ताव तयार करणार असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
खुर्सा येथे २९ सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व अन्य कार्यक्रमाचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
सर्वप्रथम गावकºयांनी वाजतगाजत गावातून गोदरीमुक्तीची रॅली काढली. ही रॅली जिल्हा परिषद शाळेत विसर्जीत झाल्यानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, माजी जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, संवर्ग विकास अधिकारी पचारे, उपसरपंच संतोष तुलावी, पोलीस पाटील प्रशांत रामटेके, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोज उरकुडे, आनंदराव क्षीरसागर उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाºया योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. यावेळी प्रास्ताविकातून ताराचंद मेश्राम यांनी गावातील विविध समस्या मांडल्या. खुर्सा गावाचा आदर्शगाव म्हणून शासनाकडे पाठपुरावा करावा, खा. नेते यांनी खुर्सा गावास दत्तक घ्यावे, शाळेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली-खुर्सा सकाळी ७ वाजताची बस सेवा सुरू करावी, मंजूर असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली. खा. अशोक नेते यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. बालाजी बावणे यांनीही मनोगत व्यक्त केले.