आरक्षणासाठी एकजुटीने सामना करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:25 AM2021-06-24T04:25:02+5:302021-06-24T04:25:02+5:30
पदाेन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. याबाबतचे नियाेजन ...
पदाेन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. याबाबतचे नियाेजन २२ जून रोजी चामाेर्शी येथील साधुबाबा कुटीमध्ये पार पडलेल्या आरक्षण हक्क समन्वय समितीच्या सभेत करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.जे. सातार हाेते. यावेळी सुमेध तुरे, नरेंद्र कोत्तावार, धीरज उराडे, संजय कुनघाडकर, गजानन बारसागडे, देवानंद बोरकर, गोकुळ झाडे, दादाजी शेडमाके, घनश्याम वाळके, संतोष चावरे, दिलीप चलाख, देवाजी तिमा, नरेश जम्पलवार, देवाजी वनेवार, शिवराम मोंगरकर, गजानन गेडाम, मारोती वनकर, मुर्लीधर सातपुते, देविदास दुधबळे, कैलास बोबाटे, नारायण अंबादे, वासुदेव येमजेलवर, मंगेश वाळके, रुपेश खेवले, विजय मेश्राम, देवानंद उराडे, सचिन मेश्राम, राकेश खेवले, प्रभाकर इटकेलवार, अतुल येलमुले, प्रशांत वालदे आदी उपस्थित होते. सभेचे संचालन ओमप्रकाश साखरे, प्रास्ताविक पुरुषोत्तम पिपरे तर आभार संजय लोणारे यांनी मानले.
===Photopath===
230621\img-20210622-wa0170.jpg
===Caption===
चामोर्शी येथे आरक्षण समिती चे फोटो