बांबूवर आधारित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:44 AM2021-09-07T04:44:14+5:302021-09-07T04:44:14+5:30
गडचिराेली येथील बांबू प्रकल्पाला पाशा पटेल यांनी ३ सप्टेंबरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी बांबू अभ्यासक संजीव करपे, माजी ...
गडचिराेली येथील बांबू प्रकल्पाला पाशा पटेल यांनी ३ सप्टेंबरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी बांबू अभ्यासक संजीव करपे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, किसान संघाचे रमेश भुरसे, प्रकल्पाचे आर्किटेक्ट यू. के. गजभिये, सोनू मशाखेत्री व प्रकल्पातील इतर कामगार उपस्थित होते.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न व गौण वनौपजावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची पाहणी, तसेच आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थाद्वारे चालविल्या जाणाऱ्या पथदर्शी बांबू प्रकल्पाला पाशा पटेल व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. या प्रकल्पातील संपूर्ण मशिनरीज, इमारत व प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाची माहिती घेतली. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात गौण वनाेपज उपलब्ध असताना त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण हाेऊ शकतात. यातून माेठ्या प्रमाणात राेजगार निर्मिती हाेऊ शकते; परंतु याकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विकासाला चालना मिळाली नाही, याबद्दल पाशा पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. साेबतच बांबू प्रकल्पातील कामाचे त्यांनी काैतुक केले.