महावितरण नुकसान भरपाई देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 05:00 AM2022-04-18T05:00:00+5:302022-04-18T05:00:40+5:30

महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे.  

Will MSEDCL compensate? | महावितरण नुकसान भरपाई देणार?

महावितरण नुकसान भरपाई देणार?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : आठ दिवसांपूर्वी केवळ दाेन ते तीनच तास वीज पुरवठा केला जात हाेता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान व भाजीपाला पिके करपली आहेत. वीज बिल भरले नाही तर महावितरण वीज पुरवठा खंडित करते. महावितरणच्या चुकीमुळे कुरखेडा, आरमाेरी, देसाईगंज या तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांची पीके करपली आहेत. या शेतकऱ्यांना महावितरण नुकसान भरपाई देणार काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे.  महावितरण कृषी पंपांना दरवर्षी उन्हाळ्यामध्ये केवळ आठ तासच वीज पुरवठा करते. याची जाणीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हाेती. त्यानुसारच त्यांनी नियाेजन करून तेवढ्या क्षेत्रात उन्हाळी धान पीक व इतर पिकांची लागवड केली हाेती. उन्हाळ्यात या पिकांना अधिकचे पाणी द्यावे लागते. मात्र आठ दिवसांपूर्वी केवळ दाेन ते तीन तासच वीज पुरवठा केला जात हाेता. यामुळे जेवढ्या क्षेत्रावर पीक लावले हाेते. तेवढ्या क्षेत्राला पाणी देणे कठिण हाेत हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी जागेला पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. 

स्वतंत्र वाॅर रूम 
महावितरणने सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी २४ तास सुरू असणारे वॉर रूम सुरू केले आहेत. त्यासाठी अभियंता व अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी ग्राहकांच्या अडचणी साेडविल्या जाणार आहेत.  

तीन तासच वीज
काही दिवस कृषिपंपांना केवळ दाेन ते तीनच तास वीजपुरवठा केला जात हाेता. या कालावधीत उन्हाळी धान पिकाला पुरेसा पाणी मिळत धान पीक करपायला लागले हाेते. काही धान करपलेही आहे. याचा खर्च महावितरणने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

आता आठ तास वीज पुरवठा सुरू
-    वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या प्रयत्नांना यश येत आहे. शनिवारी सकाळी ७ वाजेनंतर राज्यात कोणत्याही ठिकाणी महावितरणने भारनियमन केले नाही. कृषिपंपांनाही दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने सलग ८ तास वीजपुरवठा सुरू केला जात आहे, असे महावितरणने कळविले आहे. 
-    मात्र यापूर्वी पीक करपले असल्याने ते पीक पुन्हा जीवंत हाेणे कठिण आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

 

Web Title: Will MSEDCL compensate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.