विमा काढल्याशिवाय धान्य वितरण करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:16+5:302021-04-30T04:46:16+5:30
गडचिराेली : स्वस्त धान्य दुकानदारांचा शासनाने ५० लाख रुपयांचा विमा काढावा, अन्यथा धान्याचे वितरण करणार नाही, असा इशारा स्वस्त ...
गडचिराेली : स्वस्त धान्य दुकानदारांचा शासनाने ५० लाख रुपयांचा विमा काढावा, अन्यथा धान्याचे वितरण करणार नाही, असा इशारा स्वस्त धान्य दुकानदारांनी दिला आहे.
प्रत्येक लाभार्थ्याला ई-पाॅस मशीनवर थम्ब लावण्यापासून सूट देणे आवश्यक आहे. अन्यथा काेराेनाचा संसर्ग स्वस्त धान्य दुकानदार व इतर नागरिकांनाही हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काेराेनासंदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शासनाने विमा काढला आहे. त्याचप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांचाही विमा काढावा. मागील वर्षी माेफत धान्याचे वितरण करण्यात आले हाेते. त्याचे कमिशन अजूनपर्यंत देण्यात आले नाही.
धान्य वितरण न केल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र काेणत्याही परिस्थितीत विमा काढल्याशिवाय धान्य वितरण न करण्याच्या निर्णयावर जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदार ठाम आहेत.