आंदोलन मागे घेणार नाही
By admin | Published: January 5, 2017 01:34 AM2017-01-05T01:34:39+5:302017-01-05T01:34:39+5:30
तालुक्यातील कोचिनारा येथील शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यास वर्ग नाही म्हणून गावकऱ्यांनी तीन दिवसांपासून शाळेला कुलूप ठोकून
ग्रामस्थांची मागणी : कोचिनारा शाळेला खोली बांधून द्या
कोरची : तालुक्यातील कोचिनारा येथील शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यास वर्ग नाही म्हणून गावकऱ्यांनी तीन दिवसांपासून शाळेला कुलूप ठोकून आंदोलन सुरू केले आहे. शिक्षण विभागाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक बाहेर बसून शिक्षण घेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून समस्या मार्गी लावू, असे आश्वासन दिले. तरीही गावकऱ्यांनी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
वर्ग खोली बांधकामाचे लिखीत आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे त्यांनी ठरविले आहे. यावेळी सरपंच बबीता धावळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सीयाराम हलामी, हिवरू कराडे, वामन नंदेश्वर, कांताराम जमकातमन, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)