यंदा धानाचे उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:59 PM2017-10-30T22:59:09+5:302017-10-30T22:59:21+5:30
देसाईगंज तालुक्यातील कोकडी, तुळशी येथील धान पिकावर मावा, करपा, तुडतुडा रोगाने आक्रमण केले असून बहुतांश शेतकºयांच्या धान पिकाला रोगाने ग्रासले असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोकडी, तुळशी येथील धान पिकावर मावा, करपा, तुडतुडा रोगाने आक्रमण केले असून बहुतांश शेतकºयांच्या धान पिकाला रोगाने ग्रासले असल्याने शेतकºयांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धान पिकाला तुडतुडा रोगाने ग्रासल्याने धान पिकाची तणस झाली आहे. धान पीक कापणी करण्याची वेळच काही शेतकºयांच्या वाट्याला येऊ दिली नाही. परिणामी नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहे.
कोकडी येथील शेतकरी दयाराम अर्जुन बन्सोड, आनंदराव मारोती बन्सोड, जीवन सादुजी टिकले तसेच तुळशी येथील रमेश शामराव दुनेदार यांच्या धान पिकाला तुडतुडा रोगाने फस्त करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. धान कापणीचाही खर्च निघू शकत नाही अशी बिकट अवस्था आहे. धान पिकाची तणस झाल्याने या शेतकºयांना धानपीक कापणी करण्याची गरज उरलेली नाही .
कोकडी, तुळशी परीसरात अशा कितीतरी शेतकºयांच्या धान पिकाचे नुकसान तुडतुडा रोगाने केले आहे. यात कोकडी येथील अनिरूध्द धोंडूजी लांडगे, हिरामण मेश्राम, रामदास मोहुर्ले, संघमित्रा कृष्णाजी बनकर, तेजराम शिवचंद कापगते, हरीभाऊ नामदेव बन्सोड, लक्ष्मण सुकरु मेश्राम, श्रावण आडकू शेंडे, ताराचंद किसन बन्सोड, ललीता सुधीर वाढई, केशव वासुदेव बन्सोड, सुभाष दादाजी बन्सोड, वर्षा सुभाष बन्सोड, दादाजी हरी बन्सोड, केवळराम टिकले, जीवन सादुजी टिकले तसेच तुळशी येथील उमाजी मेश्राम, शरद वाघाडे, रमेश दुनेदार यांच्याही धान पिकाचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
मोठ्या प्रमाणात धान पिकासाठी लावणी पासून फवारणी पर्यंत शेतकºयांनी खर्च केला. मात्र ऐन कापणीच्या वेळेत धान पिकांना रोगाने ग्रासले असल्याने शेत लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.