शालेय अभ्यासक्रम पूर्ण होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:01+5:302021-01-25T04:37:01+5:30
यावर्षी परीक्षा दीड ते दाेन महिने उशिरा असल्या तरी वेळेअभावी १५ ते २० टक्के अभ्यासक्रम अध्यापनाविना शिल्लक राहण्याची शक्यता ...
यावर्षी परीक्षा दीड ते दाेन महिने उशिरा असल्या तरी वेळेअभावी १५ ते २० टक्के अभ्यासक्रम अध्यापनाविना शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिने गडचिराेली जिल्ह्यातील सर्व शाळा बंद हाेत्या. बराच वेळ गेल्याच्या कारणास्तव शासनाने इयत्ता दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. आता दाेन्ही वर्गाला ७५ टक्के अभ्यासक्रम आहे. इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा सुरू हाेण्याच्या एक महिन्यापूर्वी संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण हाेणे गरजेचे आहे. त्यानंतर शाळा व महाविद्यालयांमार्फत सराव परीक्षा घेतल्या जातात.
बाॅक्स...
अनावश्यक भाग वगळला
इयत्ता दहावीच्या भाषा, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रासह सर्व विषयातील २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी अनावश्यक भाग वगळण्यात आला. एका पाठामधील काही भाग तसेच काही विषयातील संपूर्ण पाठच वगळण्यात आला असल्याची माहिती इयत्ता दहावीला अध्यापन करणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांनी लाेकमतशी बाेलताना दिली.
बाॅक्स....
काठिण्य पातळीनुसार अभ्यासक्रम वगळला
इयत्ता बारावीत विज्ञान, कला व वाणिज्य या तीन शाखांसह एमसीव्हीसी अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रविष्ठ हाेतात. या सर्व शाखांमधील सर्व विषयाचा अभ्यासक्रम काठिण्यपातळीनुसार त्याच्या महत्त्वाच्या आधारे वगळण्यात आला आहे. काही विषयातील कठीण तर काही विषयातील साेपा भाग कमी करण्यात आल्याची माहिती शिक्षकांनी दिली.
काेट.....
२३ नाेव्हेंबरपासून आमच्या शाळेत नियमितपणे इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग भरविले जात आहेत. त्यापूर्वी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासक्रम अध्यापनाचा प्रयत्न करण्यात आला. बाेर्डाच्या परीक्षा येण्याच्या एक महिन्यापूर्वी दहावी व बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियाेजन आहे. त्यासाठी शिक्षकांना अतिरिक्त तासिका घ्याव्या लागतील.
- सुनील चंदनगिरीवार, प्राचार्य, जि.प.हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिराेली
काेट....
आमच्या शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थी माेठ्या संख्येने आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. डिसेंबर महिन्यापासून इयत्ता दहावी, बारावीच्या अध्यापन कार्याला गती दिली जात आहे. सर्व शिक्षकांची बैठक घेऊन त्या पद्धतीने निवेदन करून विहीत वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
- सागर म्हशाखेत्री, प्राचार्य कमलताई मुनघाटे हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिराेली
काेट....
स्मार्ट फाेनच्या माध्यमातून काेराेना लाॅकडाऊनच्या काळात अभ्यासक्रम शिकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिक्षकांनी सांगितलेला गृहपाठ पूर्ण करून ताे व्हाॅट्सॲप ग्रुपवर पाठविण्यात आला. आता नाेव्हेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले असून मी नियमितपणे शाळेत जाऊन अभ्यासक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
- विधान सिडाम, विद्यार्थी, इयत्ता बारावी
काेट....
शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आपण ऑनलाईन क्लासेस केले. पण त्यात अनेकदा व्यत्यय येत होता. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने अभ्यासाला वेग आला आहे. परीक्षेला दिवस कमी असले तरी अभ्यासक्रम कमी असल्याने विद्यार्थ्यांवर ताण थोडा कमी होईल. कमी दिवसात अधिकाधिक वेळ अभ्यास करून यश मिळविण्याचा प्रयत्न राहील.
- आर्यन ताेडासे, विद्यार्थी, इयत्ता दहावी