विजेते पारितोषिकांनी सन्मानित

By admin | Published: January 13, 2017 12:46 AM2017-01-13T00:46:00+5:302017-01-13T00:46:00+5:30

तालुक्यातील कारवाफा येथे युवा महोत्सव २०१७ चा समारोप गुरूवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

Winners of the prize winners | विजेते पारितोषिकांनी सन्मानित

विजेते पारितोषिकांनी सन्मानित

Next

कारवाफात युवा महोत्सवाचा समारोप : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिली भेट
धानोरा : तालुक्यातील कारवाफा येथे युवा महोत्सव २०१७ चा समारोप गुरूवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सीआरपीएफ १९२ बटालियनचे सेकंड इन कमांडन्ट दीपककुमार साहू होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी उपजिल्हाधिकारी चोरमुले, जिल्हा कोषागार अधिकारी उमेश गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन निरिक्षक विलास अहेर, वाहतूक निरिक्षक डब्ल्यू. व्ही. भोयर, पेंढरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे आदी उपस्थित होते. १ ते १२ जानेवारी या कालावधीत हा महोत्सव घेण्यात आला. १२ दिवस चाललेल्या या महोत्सवातील विविध स्पर्धातील विजेत्यांना पारितोषीक वितरण करण्यात आले.
यात रांगोळी स्पर्धेची प्रथम विजेती भाग्यश्री गावडे, निबंध स्पधेर्तील विजेती जोत्सना पदा, सांस्कृतिक स्पर्धेतील वैशाली चुलबुले, वत्कृत्व स्पधेर्तील अजय पेलबेलवार, प्रश्न मंजुषा स्पर्धेतील गणेश आतला, गोळा फेक (मुले) स्पर्धेतील विनोद पदा, गोळा फेक (मुली) स्पधेतील अश्विनी उईके, संगीत खुर्ची स्पधेतील अंजली तुमरेटी, १०० मीटर चालणे स्पर्धेतील नंदिनी मेश्राम, १६०० मीटर धावणे स्पर्धेतील सोमेश्वर पेलबेलवार, ८०० मीटर धावणे स्पर्धेतील मुकेश नैताम, १०० मीटर धावणे (मुले) स्पर्धेतील हिराकोस कुलसंगे, १०० मीटर धावणे (मुली) स्पर्धेतील प्रणाली तुमरेटी आणि सपना आतला, स्लो सायकल (मुले) स्पर्धेतील माहिश शेंडे, स्लो सायकल (मुली) गट ‘अ’ स्पर्धेतील आलिया पठाण आणि गट ‘ब’ स्पर्धेतील सपना आतला, रस्सीखेच स्पर्धेतील (मुली) माधुरी केकलवार ग्रुप, रस्सीखेच स्पर्धेतील (मुले) विजेते कारवाफा येथील राजेलालश्याम शहा मडावी हायस्कूल, क्रिकेट स्पर्धेतील विजेते जारावंडी येथील चमू, कबड्डी स्पधेर्तील विजेते बावणे व त्यांचे सहकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि येथे विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या ज्ञानगंगा अभ्यासिकेसाठी सीआरपीएफतर्फे १५ हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात आली.

Web Title: Winners of the prize winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.