सखी व बालकांच्या व्यक्तिमत्व विकासास वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:31 PM2018-02-19T23:31:17+5:302018-02-19T23:31:35+5:30
लोकमत समुहातर्फे सखी, बाल मंचाची चळवळ सातत्याने सुरू आहे. सखी व बाल मंचतर्फे जिल्ह्यासह महाराष्ट्रात वर्षभर स्तुत्य उपक्रम राबविले जातात.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : लोकमत समुहातर्फे सखी, बाल मंचाची चळवळ सातत्याने सुरू आहे. सखी व बाल मंचतर्फे जिल्ह्यासह महाराष्ट्रात वर्षभर स्तुत्य उपक्रम राबविले जातात. शिवाय सखी व बालकांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांच्या माध्यमातून सखी व बालकांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होत आहे. या उपक्रमाचा सखी व बालकांनी उपयोग करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवावा, असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
स्थानिक पटेल मंगल कार्यालयात लोकमत सखी मंच व बाल विकास मंचच्या वतीने दोन दिवशीय सखी व बाल महोत्सवाचा शानदार सोहळा पार पडला. रविवारी आयोजित समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षक रोशन आंबोरकर होते. कार्यक्रमाला सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, बालविकास मंचच्या संयोजिका किरण पवार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या सखी व बालकांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
दोन दिवशीय सखी व बाल महोत्सवात विविध स्पर्धांमधून जिल्हाभरातील सखी सदस्य व बालकांनी आपले कला, कौशल्य दाखविले. कार्यक्रमाचे संचालन प्रिया आखाडे, नरेंद्र उंदीरवाडे यांनी तर आभार किरण पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी तालुकास्तरावरील संयोजिकांनी सहकार्य केले. यावेळी सखी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होत्या.
या विजेत्या सखींचा झाला सन्मान
सखींच्या समूहनृत्य स्पर्धेत २० गु्रपनी सहभाग नोंदविला. यामध्ये आरमोरी सखीच्या ग्रुपने अव्वल स्थान पटकाविले. गडचिरोली ग्रुपने द्वितीय, देसाईगंज तृतीय तर अहेरी ग्रुपने चवथा क्रमांक पटकाविला.
आरमोरीच्या सुनीता तागवान गु्रपने प्रथम तर धानोराच्या ज्योती उंदीरवाडे ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकाविला.
सखी मायलेक स्पर्धेत वडसा येथील वृषभ व पिंकी ठकराणी यांनी प्रथम, द्वितीय धानोरा येथील मानस व ज्योती उंदीरवाडे तर तृतीय क्रमांक गडचिरोली येथील तृप्ती अलोणे यांनी पटकाविला.
एकलनृत्य स्पर्धेत गडचिरोली येथील अपर्णा दरडे प्रथम, संतोषी आंबोरकर द्वितीय तर आरमोरी येथील प्राची कटरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्मिता खोब्रागडे, राणी आंबोरकर, प्रतिभा पारधी, सुनीता तोडेवार, रचना बोमकंटीवार आदी सखी स्पर्धक प्रोत्साहनपर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
एकपात्री अभिनय स्पर्धेत आरमोरी येथील रोशनी बैस हिने प्रथम क्रमांक पटकाविला. नाटिका स्पर्धेत देसाईगंजच्या गु्रपने प्रथम तर वैरागडच्या ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धांमधील हे विद्यार्थी स्पर्धक ठरले पुरस्काराचे मानकरी
सखी व बाल महोत्सवादरम्यान रविवारी बाल विकास मंच गडचिरोलीच्या वतीने बालक व विद्यार्थ्यांसाठी एकल, समूह नृत्य तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धा प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक अशा तीन गटात पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन एसडीपीओ डॉ. सागर कवडे व शिक्षक रोशन आंबोरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
एकलनृत्य स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक विद्या निकेतनची विद्यार्थिनी गौरी सोेरते, द्वितीय क्रमांक कारमेल हायस्कूलची संघवी कापकर तर तृतीय क्रमांक संबोधी मून हिने पटकाविले. वंशिका चांगलानी व अनन्या जाधव यांनी प्रोत्साहनपर पुरस्कार मिळविले.
उच्च प्राथमिक गटात घेण्यात आलेल्या एकलनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक एसओएसची विद्यार्थिनी आर्या आखाडे, द्वितीय मुस्कान बारसिंगे तर तृतीय क्रमांक सिद्धी देशपांडे हिने पटकाविला. दक्षता काटवले व नेत्रा कंकडालवार यांनी प्रोत्साहनपर पुरस्कार मिळविले.
माध्यमिक गटातून एकलनृत्य स्पर्धेत शिवाजी हायस्कूलची स्नेहा टेकाम तर द्वितीय चेतना लोहकरे हिने पटकाविला. प्रेरणा लेनगुरे व गुंजन तागवान या प्रोत्साहनपर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्राथमिक गटातून कारमेल हायस्कूलची अथर्व निंबाळकर प्रथम तर प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंटचा पूर्वेश गेडाम याने द्वितीय क्रमांक पटकाविला. शिवम सावळकर, लक्ष्मी गेडाम व श्रेयस डहाळे यांनी प्रोत्साहनपर पुरस्कार मिळविले.
उच्च प्राथमिक गटातून राणी दुर्गावती कन्या विद्यालयाची सृष्टी डोईजड प्रथम, कारमेल हायस्कूलची लिमया क्षिरसागर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. प्रगती म्हशाखेत्री व दीपिका गोंधळे यांनी प्रोत्साहनपर पुरस्कार पटकाविला.
माध्यमिक गटात घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शिवाजी हायस्कूलची पूजा नैताम हिने प्रथम तर नेहा डहाळे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. वैष्णवी वरंगटीवार, जान्हवी जुमनाके यांनी प्रोत्साहनपर पुरस्कार मिळविला.
समूहनृत्य स्पर्धेत प्राथमिक गटातून मयुरी ग्रुपने प्रथम तर गजानन ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकाविला.
उच्च प्राथमिक गटातून शिवाजी महाराज ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. रिया केळझरकर ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकाविला.
माध्यमिक गटातून प्रेरणा लेनगुरे गु्रपने प्रथम क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेत राणी दुर्गावती ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकाविला.