इंधनासह गॅसची दरवाढ मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:58+5:302021-07-10T04:25:58+5:30
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात एटापल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवार (दि. ६) तहसीलदारांमार्फत ...
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात एटापल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवार (दि. ६) तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविले.
निवेदनात गॅस, पेट्रोल, डिझेल व केंद्र शासनाशी निगडित असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे घरगुती आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने यापूर्वी अनेकदा चूल पेटवा व अन्य आंदोलने करून केंद्र शासनाचे लक्ष वेधले; परंतु केंद्र शासनाने आंदोलनाची दखल न घेता उलट भाववाढ करण्याची मालिका सुरूच ठेवल्याने रविवार ४ जुलै रोजी एटापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्यांचा विचार करून तत्काळ गॅस, पेट्रोल, डिझेल व अन्य तत्सम जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ मागे न घेतल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देताना शाहीन हकीम यांच्यासमवेत एटापल्ली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, महिला तालुकाध्यक्ष ललिता मडावी, शहराध्यक्ष पाैर्णिमा श्रीरामवार, माजी पंचायत समिती सभापती बेबी लेकामी, जिल्हा परिषदेच्या सदस्य ग्यानकुमारी कौशिक, ममता पटवर्धन, माजी पंचायत समिती सभापती सपना कोडापे, पंचायत समिती सदस्य निर्मला गावडे, गेदाच्या सरपंच रिना मडावी, गट्टाचे सरपंच पूनम लेकामी, पद्मा बिरमवार, रेहाना शेख, लक्ष्मण नरोटे, मीनाक्षी मडावी, आदी उपस्थित हाेते.
090721\1651-img-20210709-wa0017.jpg
फोटो